स्वप्न तरी हवे तसे घडवा


तुमच्या मनात जे काही घडते ती तुमची कल्पना आहे. त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. म्हणजे हे जग नियंत्रणाबाहेर गेलेले नसून, खरे पाहता तुमची कल्पना नियंत्रणाबाहेर गेली आहे. तुमच्या मनात जे घडते ते तुमच्या नियंत्रणात नसते, म्हणूनच तुमच्या आनंदात आणि दु:खात सतत चढउतार चालूच असतो. कारण तुमच्या सभोवताली जे घडत आहे त्याला सतत तुमची अनिवार्य प्रतिक्रिया चालूच असते. Make the dream come true

तुम्हाला हवे तसे हे जग तुम्ही चालवू शकत नाही, तर किमान तुमचे स्वप्न तरी तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे घडवायला हवे. असे असेल तर मग तुम्ही स्वाभाविकपणे स्वतःला अगदी प्रसन्न आणि खूप छान ठेवाल. योग विज्ञानात आपण माणूस आजारी आहे म्हणतो, हे केवळ याच कारणासाठी की त्याला स्थिर कसे राहायचे हेच माहिती नाही. तुमची मानसिक कृती सतत चालूच असते. अशा स्थितीत, तुम्हाला काहीच समजणार नाही.

तुम्ही विचार करता, ती फक्त मानसिक प्रक्रिया आहे, ती काही अस्तित्वाशी संबंधित वास्तविक प्रक्रिया नव्हे. तिचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध असावा, हे गरजेचे नाही. तुम्ही आत्ता ज्याप्रकारे विचार करता, हे मुख्यतः सामाजिक प्रभावच याला चालना देत आहेत. कारण मानवी मन हे फक्त केवळ बाहेरचे अनुकरण करत असते. याच प्रकारे संस्कृती, परंपरा, धर्म आणि विश्वास प्रणाली तयार केल्या जातात. एकदा तुम्ही अनुकरण करू लागल्यावर तुमचे जीवन जसे आहे तसे जाणून घेण्याची आणि त्याकडे बघण्याची क्षमता हरवून बसता.

आकलन म्हणजे सर्व काही ते जसे आहे तसे बघणे, कुठल्याही गोष्टीबद्दल मत किंवा कल्पना मांडून त्यांना विकृत करणे नव्हे. तुम्ही अनुकरण करता, तेव्हा तुम्ही असे गृहीत धरता की भूतकाळात लोकांनी याचे जाणून घेतले होते आणि ते योग्यच असेल. यामुळे सामाजिकदृष्ट्या तुम्हाला हे फार सोयीस्कर होते, कारण मग तुम्ही त्या सामाजिक संस्कृतीत चांगले फिट झालेले असता, परंतु यामुळे जीवनाचा सखोल अनुभव घेता येणार नाही. असे केल्याने आध्यात्मिक स्वरुपाचे असे काहीही मनुष्याच्या जीवनात उतरणार नाही.

Make the dream come true

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात