वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसया तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळलं आहे. त्यातच काँग्रेसच्या नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एक मोठं विधान केलं आहे. राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. I am Politically against Congress and NCP: Chief Minister Thackeray
महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरे यांच्या पक्षाबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे.
राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र, त्याचा असा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, नाही. ते चुकीचं ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा पटोले यांना खोचक टोला
‘कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या स्वबळावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे सभागृहात एकच हशा पिकली.
‘माझी कारकिर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केलं ते सर्वच वाईट अशी माझी भूमिका कधी नव्हती. पण, या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे ते नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे, २५ वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे’, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना दिला.
तसंच, स्वबळाच्या नारेबाजीवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व्यासपीठावरून टोला लगावला. ‘आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वतः चालत येऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App