विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : एकतर सीमाप्रश्न सोडवा किंवा चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा, या मागणीसाठी सीमाभागातील मराठी बांधवांनी दसरा चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे आंदोलन केले. For the new Belgaum Border residents gathered
महाराष्ट्र एकीकरण समितीने शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
गेली ६५ वर्षे कर्नाटक सरकारच्या अन्याय, अत्याचाराचा सामना करत लोकशाही मार्गाने सीमा लढा तेवत ठेवणारे सीमावासीय पुन्हा आक्रमक झालेत. सीमा भागातील बांधव आज कोल्हापूरातील दसरा चौक येथे आले. शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केले.
या आंदोलनासाठी सीमा भागातील मराठी बांधव, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांना आमंत्रित करण्यात आलं. १९९३ मध्ये शरद पवार यांनी सीमा प्रश्नी सुचवलेल्या तोडग्याचा पुनर्विचार करावा, अशी प्रमुख मागणी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केली.
– सीमाप्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी
– नवीन बेळगावसाठी सुद्धा सीमावासीय एकवटले
– चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवावे
– सीमाप्रश्नी शरद पवार यांचा तोडगा स्वीकारावा
– मराठी भाषकांची आंदोलनात आर्त मागणी
– गेली ६५ वर्ष सीमाभागात मराठी बांधव अडकले
– कर्नाटकाच्या जोखडातून आम्हाला सोडवा
– कानडी भाषा सक्तीने मराठीची गळचेपी होते
For the new Belgaum Border residents gathered
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App