WATCH : चोरीला गेलेली १४० गाढवे शोधून देण्यासाठी तक्रार परळी शहरातील घटना पालकमंत्र्यांच्या कानी


विशेष प्रतिनिधी

बीड : दुचाकी, मोबाईल यासह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील.मात्र बीडच्या परळी शहरातून चक्क १४० गाढवे चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शहरात घडला आहे. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.140 stolen donkeys Complaint to find out

परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार आणि वडार समाजाकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून एक एक करत तब्बल १४० गाढवे चोरीला गेली आहेत. या संदर्भात संभाजीनगर पोलिस ठाण्यात गाढवांच्या मालकांनी धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, काम नसले की, ही गाढवे शहरात सोडून दिली जातात. जेव्हा कामाची गरज लागेल तेव्हा त्यांचा शोध मालकांकडून घेतला जातो. त्यामुळे त्यांनी गाढवांची खरेदी कुणाकडे केली होती? आणि त्याचे दाखले मिळाल्यास गाढवे शोधण्यासाठी मदत होईल. त्या मदतीच्या आधारे शोध घेतला जाईल. दरम्यान, या प्रकरणात खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती देऊन शोध सुरू आल्याचे सांगितले आहे.

– चोरीला गेलेली १४० गाढवे शोधून देण्यासाठी तक्रार
– परळी शहरातील घटना, पोलिस ठाण्यात धाव
– भोई, बेलदार आणि वडार समाजाची गाढवे
– परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी वापर
– खरेदीचे दाखले मिळाल्यास गाढवे शोधण्यास मदत

140 stolen donkeys Complaint to find out

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*