अयोध्येच्या विकासासाठी २० हजार कोटींची योजना; पंतप्रधानांच्या उपस्थितीत २५ जूनला बैठकीत चर्चा


वृत्तसंस्था

अयोध्याः अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जाणार आहे. त्यासोबत संपूर्ण अयोध्येचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने (एडीए) शहरासाठी २० हजार कोटीच्या विकास योजना तयार केल्या आहेत. अयोध्येतील या विकास कामाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला अयोध्येत येणार आहेत. यावेळी ते प्रकल्पाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पर्यटन मंत्रीही उपस्थित राहतील. For Ayodhya Development 20 thousand Crore scheme; Meeting Is Arranged in the presence of prime minister modi on 25th June

खालील योजनांना मिळाली मान्यता

  • ग्रीनफील्ड शहर योजना १० हजार कोटी रुपये खर्च
  • भगवान राम आंतरराष्ट्रीय विमानतळ ५ हजार कोटी
  • शरयू काठ परिसरात २००० कोटीची विकासकामे
  • रिंग रोडसाठी २५८८ कोटीचा, ६५ किमी लांबीचा
  •  ब्लू रोडसाठी २००कोटी, अगोदरचा रस्ता आणखी विकसित करणार
  • पर्यटन केंद्र २७५ कोटी रुपये खर्च करून बांधणार
  • पंचकोसी परिक्रमा मार्गासाठी २८९ कोटी
  • राम मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यसाठी ३६३ कोटी
  • बहुराष्ट्रीय उद्यानासाठी २३७ कोटी
  • एमआरयूटी योजनेसाठी ३०० कोटी
  • स्मार्ट सिटीसाठी ४९ कोटी
  • ८७३ चौरस किलोमीटरमध्ये बेंचमार्किंग व्हिजन प्लॅन एडीएच्या योजनेनुसार पहिल्या प्रकल्पात इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची योजना आहे
  • १३३ चौरस किलोमीटर लांबीच्या अयोध्याच्या मास्टर प्लॅनला दुसरे स्थान आहे.
  • प्राधिकरणाने ८७३ चौरस किलोमीटरमध्ये बेंचमार्किंग व्हिजन योजना तयार केली आहे.
  • ग्रीन फील्ड टाउनशिप ५ किमीमध्ये असेल
  • अयोध्येत राहणाऱ्या ५ हजार लोकांनी योजना तयार तयार केल्या आहेत.
  • विविध देश व राज्यातील ५०० पर्यटकांच्या सूचनाही घेतल्या आहेत.

कोणती कामे सध्या सुरू आहेत ?

  • अयोध्येत रहदारी सुधारणेवर काम सुरू आहे
  • सौर शहर, सुंदर अयोध्या योजनांवर काम सुरू आहे.
  • अयोध्येत २४ मीटर ते ४० मीटर रुंद आणि १३ किलोमीटरचा रस्ता ८४ कोटी खर्चून तयार होत आहे.
  • वरील रस्ता सादतगंज, अयोध्या, नया घाटमार्गे राम मंदिरात पोचेल.
  • हनुमान गढी तिराहा ते राम मंदिर हा ८५० मीटर रस्ता ५२ कोटी खर्चून बांधला जात आहे.
  • पंचकोसी परिक्रमा मार्गाचे बांधकाम २२७ कोटींचे आहे

 

शरयू नदीच्या सौंदर्यीकरणावर लक्ष

  •  पर्यटकांच्या सुविधेसाठी केंद्र १८२ कोटी रुपये खर्च करून बांधणार आहे. तेथे आंतरराष्ट्रीय संग्रहालय बांधले गेले आहे.
  •  बायपास रोड ते नया घाटपर्यंत २८ कोटीच्या खर्चासह २ किमीचा रस्ता तयार केला जाईल.
  •  शरयू काठावरील स्नानगृहाचे सौंदर्यीकरण करून गुप्ता घाट ते सरयू आरती स्थळापर्यंत १० कि.मी. क्षेत्र विकसित केले जाईल.
  •  पुढे अयोध्याच्या दुसर्‍या टोकाला ३ किमी क्षेत्र विकसित केले जाईल.
  • याशिवाय जलाशय, प्राण्यांचे संवर्धन, वाल्मिकी रामायण सर्किट, वृक्षारोपण तसेच रोजगाराचे नवीन उपक्रम राबविण्याची योजना आहे.

For Ayodhya Development 20 thousand Crore scheme; Meeting Is Arranged in the presence of prime minister modi on 25th June

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात