म्हैसूर अत्याचारप्रकरणी पाच संशयितांना अटक, संशयितांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश


विशेष प्रतिनिधी

बंगळूर – म्हैसूरमधील चामुंडेश्वरी टेकडीजवळ महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी सहापैकी पाच संशयितांना म्हैसूर शहर पोलिसांनी तमिळनाडूमधून अटक केली. संशयितांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या टोळीने २४ ऑगस्ट रोजी युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिच्या मित्राला मारहाण केली होती. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. Five peoples arrest in rape case

सर्व संशयित मजूर असून यात एक इलेक्ट्रीशियन आणि ड्रायव्हर आहे. संशयितांनी युवतीवर बलात्कार करण्यापूर्वी तिचा मित्र असलेल्या विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती.



प्रकरण उघडकीस आल्यानंतर ८५ तासांत यशस्वी कारवाई करून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. सरकारने ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्यांना पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले. संशयितांच्या अटकेनंतर त्यांना न्यायालयात दोषी ठरविणे हे पुढील आव्हान आहे. पीडित विद्यार्थिनीने अद्याप पोलिसांना निवेदन देणे बाकी आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपाची खात्री पटवणे ही पुढील महत्त्वाची पायरी आहे.

पीडित युवती अद्याप निवेदन देण्याच्या स्थितीत नाही. आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाही. तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात आला, असे गृहमंत्री म्हणाले.

Five peoples arrest in rape case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात