मुंबई महापालिका निवडणुकांआधी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला, युवक शाखेच्या कार्याध्यक्षांचा राजीनामा

Conflict in Mumbai Congress, youth wing working president Suraj Singh Thakur resigned

Conflict in Mumbai Congress : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील कलह समोर आला आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचे भांडण आणि गटबाजी आता समोर येत आहे. युवक काँग्रेस अध्यक्षपदाची घोषणा मंगळवारी संध्याकाळी उशिरा करण्यात आली. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी यांना युवक काँग्रेस अध्यक्ष, तर एनएसयूआय मुंबईचे माजी अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना कार्याध्यक्ष करण्यात आले. आता सूरजसिंह ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे. Conflict in Mumbai Congress, youth wing working president Suraj Singh Thakur resigned


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील कलह समोर आला आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतचे भांडण आणि गटबाजी आता समोर येत आहे. युवक काँग्रेस अध्यक्षपदाची घोषणा मंगळवारी संध्याकाळी उशिरा करण्यात आली. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी यांना युवक काँग्रेस अध्यक्ष, तर एनएसयूआय मुंबईचे माजी अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना कार्याध्यक्ष करण्यात आले. आता सूरजसिंह ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे.

फेब्रुवारीमध्ये बीएमसीच्या निवडणुका

BMCच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी मध्ये होणार आहेत. काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीही दिसून येत आहे. सूरजसिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या नावाने ट्विट केले की, ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. मात्र, ते काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून कायम राहतील. विशेष म्हणजे, सूरज ठाकूर मुंबईत आक्रमक युवा नेते आणि पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखले जातात.

Conflict in Mumbai Congress, youth wing working president Suraj Singh Thakur resigned

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात