सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमच्या नावांना केंद्राची मान्यता, 3 महिला न्यायाधीशांचा समावेश

Center approves names of collegiums for appointment in Supreme Court, 3 women judges included

names of collegiums for appointment in Supreme Court : केंद्राने सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठवलेली सर्व 9 नावे स्वीकारली आहेत. यामध्ये तीन महिला न्यायाधीशांची नावेही समाविष्ट आहेत. कॉलेजियमने केंद्राला पाठवलेल्या नावांमध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि बी.व्ही.नागरत्ना यांचा समावेश आहे. त्याशिवाय न्यायमूर्ती ए.एस. ओका, विक्रम नाथ, जे के माहेश्वरी, सीटी रवींद्रकुमार, एम एम सुंदरेश आणि वरिष्ठ वकील पी. एस. नरसिंह यांचे नाव समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमकडून नावांची शिफारस केली जाते. या नावांवर केंद्र अंतिम निर्णय घेते. Center approves names of collegiums for appointment in Supreme Court, 3 women judges included 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्राने सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठवलेली सर्व 9 नावे स्वीकारली आहेत. यामध्ये तीन महिला न्यायाधीशांची नावेही समाविष्ट आहेत. कॉलेजियमने केंद्राला पाठवलेल्या नावांमध्ये न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि बी.व्ही.नागरत्ना यांचा समावेश आहे. त्याशिवाय न्यायमूर्ती ए.एस. ओका, विक्रम नाथ, जे के माहेश्वरी, सीटी रवींद्रकुमार, एम एम सुंदरेश आणि वरिष्ठ वकील पी. एस. नरसिंह यांचे नाव समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी कॉलेजियमकडून नावांची शिफारस केली जाते. या नावांवर केंद्र अंतिम निर्णय घेते.

17 ऑगस्ट रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीनंतर 9 न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 3 महिला न्यायाधीश आहेत. तसेच, वरिष्ठ वकिलाची नियुक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कॉलेजियमने शिफारस केलेली नावे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एएस ओका, गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ, सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे के माहेश्वरी, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सीटी रवींद्र कुमार आणि केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी कॉलेजियमने ज्या तीन महिलांची शिफारस केली आहे, त्यामध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हिमा कोहली, गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागरत्ना यांच्या नावावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या 2027 मध्ये देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होऊ शकतात.

Center approves names of collegiums for appointment in Supreme Court, 3 women judges included

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण