सिंहगड रोडवरील उड्डाणपुलासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

वृत्तसंस्था

पुणे : सिंहगड रस्त्यावरच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुणे महापालिकेचा स्थायी समितीने या पुलाचा कामासाठी १३५ कोटींची आर्थिक तरतूद करायला मंजुरी दिली आहे. आता निविदा निघून हे काम कधी सुरू होणार ? ,याकडे लक्ष लागले आहे. Finally the fund’s for the flyover of Sinhagad road approved

सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे महापालिकेने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. २०१८-१९ मध्ये त्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर सल्लागाराची नेमणूक केली होती. या सल्लागाराकडून प्राप्त झालेल्या ४ पर्यायांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे सूचाविले होते. यापैकी राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंत पूल बांधला जाणार आहे.या कामासाठी२०१९-२०२०मध्ये ३० कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.पण लॉकडाऊनमुळे या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी लागणारी १३५ कोटींची तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करायला स्थायी समितीने मंजुरी दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.

Finally the fund’s for the flyover of Sinhagad road approved

महत्त्वाच्या बातम्या