स्तब्ध-नि:शब्द! राजस्थानात पाण्याअभावी 6 वर्षाच्या निरागस मुलीचा मृत्यू ; 45 डिग्री तापमान-25 किलोमीटर पर्यंत पाणीच नाही ; पावसाच्या थेंबाने वाचवला आज्जीचा जीव ; गहलोत सरकार गप्प का?

  • रविवारी ही घटना जलोर जिल्ह्यातील राणीवाडा भागात घडली.तीव्र ऊन आणि पाण्याअभावी या मुलीचा मृत्यू झाला.

  • पावसाच्या थेंबामुळे वृद्ध आज्जीचा जीव वाचला.एका मेंढपाळाने पोलिसांना बोलावले.

  • राजस्थानमध्ये 2 घोट पाण्याअभावी ह्रदयद्रावक घटना घडली आहे .5 वर्षीय चिमुकलीने आपल्या आज्जीसमोर जीव सोडला .हे पाहिल्यानंतर आज्जी देखील बेशुद्ध झाली …

विशेष प्रतिनिधी

जयपूर: राजस्थानच्या जलोर जिल्ह्यात घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.आजच्या युगात पाण्याअभावी एखाद्या निष्पाप जीवाचा मृत्यू होणे ही अत्यंत लज्जास्पद परिस्थिती आहे. परंतु हे घडले आहे  राजस्थानच्या भूमिवर. ही घटना जलोर जिल्ह्यातील राणीवाडी तहसीलची आहे, जिथे एक वृद्ध महिला आपल्या 5 वर्षाच्या नातीसमवेत एका गावातून दुसर्या गावी  जाण्यास निघाली होती. मात्र कडक ऊन आणि  पाण्याअभावी त्या मुलीचा मृत्यू झाला तर त्या महिलेवर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Speechless ! 6-year-old innocent girl dies due to lack of water in Rajasthan; At 45 degree temperature ; there is no water for up to 25 kilometers; Raindrops save grandmother’s life; Why is the Gehlot government silent?

मिळालेल्या माहितीनुसार, राणीवाडा तहसील अंतर्गत डुंगरी येथे राहणार्या वृद्ध सुखदेवी यांचे सिरोही जिल्ह्यातील मंदार जवळील रायपुरमध्ये  माहेर आहे. सुखिदेवी आपल्या 5 वर्षाच्या नातीसह माहेरी गेली होती. रविवारी 6 जून रोजी, सुखदेवी नात अंजलीसह तिच्या बहिणीकडे जाण्यासाठी पायी निघाली .सकाळी लवकर निघाल्याने ऊन नव्हतं सुखीदेवीला वाटले रस्त्यात पाणी मिळेल आपण दुपारपर्यंत गावी पोहचू मात्र 7 किलोमीटर अंतरावर 45 डिग्री तापमानात जवळपास कुठेही पाणी न मिळाल्याने नातीने आज्जी समोर जीव सोडला .हे पाहून आज्जी देखील बेशुद्ध झाली .

पाण्याअभावी या मुलीचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातही समोर आले आहे.

9 तासानंतर मिळाली मदत

तब्बल 9 तासानंतर सायंकाळी 5च्या सुमारास
गावकर्यांना त्यांच्याविषयी समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वृद्ध आज्जीला पाणी पाजून रुग्णालयात दाखल केले.

त्याच वेळी, राज्य सरकारचे जिल्हयातील प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या घटनेसंदर्भातील प्रश्न  सतत टाळले .

सोनिया-राहुल-प्रियांका गप्प का ?

पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे मुलीचा मृत्यू होणे ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. याला राजस्थान सरकार जबाबदार आहे. कॉंग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आता गप्प का आहेत ?

प्रकाश जावडेकर

Speechless ! 6-year-old innocent girl dies due to lack of water in Rajasthan; At 45 degree temperature ; there is no water for up to 25 kilometers; Raindrops save grandmother’s life; Why is the Gehlot government silent?