विशेष प्रतिनिधी
मुंबई : ब्रिटन आणि आफ्रिकेत कोरोना नवा स्ट्रेन आढळलेत तसा महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रूप समोर आले आहे, ते म्हणजे आर्थिक गैरव्यवहारात तपासाची ईडीची नोटीस आली की नेत्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येऊ लागली आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरांवर आणि ऑफिसेसवर ईडीचे छापे पडल्यानंतर लगेच सरनाईकांना क्वारंटाइन व्हावे लागले होते, ही घटना ताजी असतानाच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बाबतीतही तशीच लक्षणे आढळून आली आहेत. eknath khadse to avoid ED, sites corona symtums from 28 december
खडसे यांना ईडीने चौकशी आणि तपासासाठी नोटीस पाठवून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आणि त्यांना सर्दी, ताप आणि त्या अनुषंगाने कोरोनाची लक्षणे आढळून आली. २८ डिसेंबरपासून ही लक्षणे आढळून आल्याने मी १४ दिवस विलगीकरणात राहायचे ठरविले आहे. मला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहता येणार नाही, असे खडसे यांच्या सहीने हे पत्र ईडीला पाठविण्यात आले आहे. या लेटरहेडवर राष्ट्रवादीचे चिन्ह अंकीत आहे.
प्रताप सरनाईक यांनी देखील ईडीला अशाच आशयाचे पत्र पाठविले होते. अर्थात प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत आणि आता एकनाथ खडसे या नेत्यांनी ईडी राजकीय हत्यार आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही. वगैरे समान भाषाही वापरली आहे.
ईडीने देखील नेत्यांच्या कोरोना लक्षणांची दखल घेऊन त्यांना १४ दिवसांनंतर कार्यालयांमध्ये हजर राहण्याची परवानगी दिली आहे. ईडीने या नेत्यांना तसे कळविलेही आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App