ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचे यथोचित स्मारक उभारून वंदन


  • भाजप खासदार जफर इस्लाम यांचा पुढाकार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धात हुतात्मा झालेले ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या काबरीचे नूतनीकरण करण्यासाठी भाजपचे खासदार जफर इस्लाम यांनी पुढाकार घेतला आहे. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांचे यथोचित स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. bjp-mp-zafar-islam-to-get-grave-of-brigadier-mohammad-usman

पाकिस्तानी सैन्याने आणि टोळ्यांनी जम्मू- काश्मीरमधील जहंगार आणि नौशेर ताब्यात घेतले होते. ही ठाणी 1948 मध्ये ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने पुन्हा ताब्यात घेतली होती. या कारवाईत ब्रिगेडियर उस्मान यांना वीरगती प्राप्त झाली होती.

दक्षिण दिल्लीतील बटाला हाऊस काबरस्तान येथे ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांची कबर आहे. त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ही बाब त्यांच्या लक्षात येताच ब्रिगेडियर उस्मान यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी खासदार इस्लाम यांनी पुढाकार घेतला आहे.

bjp-mp-zafar-islam-to-get-grave-of-brigadier-mohammad-usman

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा गौरव करण्याची भाजप पक्षाची परंपरा आहे. त्यानुसार मी कबरीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कंबर अत्यंत वाईट परिस्थितीत असल्याकडे ज्यांनी लक्ष्य वेधले त्यांचे मी आभार मानतो, असे खासदार इस्लाम यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण