Dhananjay mundhe: हे सगळं गंभीर ! दबावाविना चौकशी झाली पाहिजे ;करूणा मुंडे-धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं भाष्य


  • परळीतील घटनेनंतर फडणवीसांनी कायदा व सुव्यवस्थेवर उपस्थित केला प्रश्न.

विशेष प्रतिनिधी

नागपूर :राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. रविवारी परळीत झालेल्या प्रकारानंतर आता करुणा मुंडे यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून, दबावाविना चौकशी करण्याची मागणी केली आहे.Dhananjay mundhe: All this is serious! Inquiry should be done without pressure; Karuna Munde-Fadnavis comment on Dhananjay Munde case

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात चर्चेत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी धनंजय मुंडे-करुणा मुंडे प्रकरणावर फडणवीसांनी भूमिका मांडली. ‘यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलण्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचा कारण नाहीये.’

तिथे ही घटना घडली आहे; त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात ठेवली जात आहे, हे स्पष्ट होत आहे. करुणा यांची चौकशी झाली पाहिजे. पिस्तूल ठेवल्याचा व्हिडीओ आणि मिळालेलं पिस्तुल हे सर्व गंभीर आहे. दबावाविना याची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मलाही आपल्या माध्यमातून ईडीने look out नोटीस काढली आहे, असं कळलं आहे. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने आणि कायद्याच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं तेच योग्य होईल’, असा सल्ला फडणवीस यांनी देशमुखांना दिला.

 

Dhananjay mundhe: All this is serious! Inquiry should be done without pressure; Karuna Munde-Fadnavis comment on Dhananjay Munde case

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात