कराडमध्ये घरोघरी कोरोनाची चाचणी; नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने निर्णय


वृत्तसंस्था

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊऩ कोरोना चाचणी करण्यास कराड नगरपालिकेने रविवारी प्रारंभ केला. रविवार व शुक्रवार पेठेत पथकाने कोरोनाची चाचणी केली. काही ठिकाणी विरोध मोडून नगरपालिकेने सक्तीने चाचणी केली आहे. Corona testing at home in Karad

कराड शहरात बाधित व संपर्कात येणारे नागरिक घऱाबाहेर फिरत आहेत. त्यामुळे बाधितांच्या घरी जाऊन त्यांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे. त्यानंतर त्यांची घरात जाऊन चाचणी करण्याचा धडाका नगरपालिकेने लावला आहे.नागरी आरोग्य केंद्राचे पथक रुग्णवाहिकेसह प्रथम बाधित व्यक्तीच्या घरी जाऊन कोरोना चाचणी करत आहे. त्या नंतर कोरोनाबाधितांच्या सहवासात असलेल्यांची चाचणी घरीच जाऊनच करत आहे. नगरपालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घेण्यात आली.

शहरात बाधितांच्या अति सहवासात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. मात्र, त्याला कोणीच जुमानत नसल्याने घरोघरी चाचण्या सुरु केल्या आहेत.

Corona testing at home in Karad

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था