बंगालच्या राजकारणात “प्रचंड खळबळ”; डावे – काँग्रेस एकत्र लढणार; ममतांना “हादरा”; राहुल – प्रियंका विरोधात प्रचार करणार


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भाजपला राजकीय शत्रू समजून त्याच्या विरोधात तोफा डागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज “प्रचंड राजकीय हादरा” बसला. ममतांच्या राजवटी विरोधात आधीच्या सत्ताधारी डाव्या पक्षांनी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राज्यातील “राजकीय समीकरणच” बदलून गेल्याचा भास झालाय. congress – left parties come together for assembly elections against mamata banerjee

त्यातही डाव्या आणि काँग्रेस आघाडीचा खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचार करणार असल्याची बातमी आल्यानंतर तर ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये “प्रचंड खळबळ” उडाली असून या भावा बहिणीच्या प्रचंड हल्ल्याला तोंड कसे द्यायचे याची “खलबते” रॉयटर्स बिल्डिंग आणि तृणमूळ भवनात सुरू झाली आहेत. congress – left parties come together for assembly elections against mamata banerjee

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने डाव्या पक्षांशी युती केल्याचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ट्विट केले आहे. डाव्या पक्षांशी युती करण्यास काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदिल दिला आहे.

त्यामुळे २०१६ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे “प्रचंड आव्हान” ममता बॅनर्जीं यांच्यापुढे उभे राहणार आहे, असे राजकीय निरीक्षक मानत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि डाव्यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी विधानसभेत तब्बल ४४ जागा जिंकून काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तर एकेकाळी बंगालवर अधिराज्य गाजविणाऱ्या सीपीएमला २६ जागा जिंकता आल्या होत्या. उर्वरित डाव्या पक्षांना काही जागा मिळाल्या होत्या. भाजपला केवळ ३ जागा जिंकता आल्या होत्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४२ पैकी भाजपला “फक्त” १८ लोकसभा मतदारसंघ जिंकता आले. एवढी भाजपची कामगिरी वगळता, राज्यात ममता बॅनर्जींची तृणमूळ काँग्रेस आणि डावे पक्ष – काँग्रेस युती यांच्यात “जबरदस्त टक्कर” होईल, असे दिसू लागल्याचे राजकीय निरीक्षक म्हणू लागले आहेत.

मात्र विद्यमान पक्ष बदल केल्याने कॉंग्रेसकडे केवळ २३ आमदार आहेत तर भाजपकडे १६ आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजप बळकट होत असताना कॉंग्रेसला किती यश मिळेल?

congress – left parties come together for assembly elections against mamata banerjee

या वेळी बंगालमधील विधानसभा निवडणुका खूप महत्त्वाची आहे. टीएमसीचे डझनहून अधिक आमदार ममता बॅनर्जी यांना सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. इतकेच नव्हे तर नुकत्याच दोन डाव्या-आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर डावे आणि कॉंग्रेस मिळून किती यश मिळवणार याची उत्सुकता आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात