अमर्त्य सेन यांनी बळकावली विश्वभारती विद्यापीठाची जमीन; वरती कुलगुरूंवरच झोडल्या दुगाण्या; ममता आल्या समर्थनासाठी बाहेर


वृत्तसंस्था

कोलकता : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी विश्वभारती विद्यापीठातील प्लॉट बेकायदा बळकावला आहे, अशी तक्रार विद्यापीठाने बंगाल सरकारकडे लेखी केली. विद्यापीठाच्या जमिनी अनेकांनी स्वतःच्या असल्याचा दावा केला आहे, असे पत्रात विद्यापीठाने म्हटले आहे. भाडेपट्ट्याच्या करारापेक्षा १३ डेसीमल अधिक जमीन अमर्त्य सेन यांच्या कब्जात आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. Amartya Sen on Vishva-Bharati list of ‘illegal plot holders

दस्तुरखुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी ही जमीन खरेदी करून विद्यापीठाला दिली होती. परंतु अनेकांनी बेकायदा उद्योग , शाळा आणि रेस्टरंट साठी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. १९८० ते १९९० या दशकात अनेक कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून जमिनी बळकावण्यात आल्याचे विद्यापीठाचे कागदोपत्रांवर आधारित म्हणणे आहे.

अमर्त्य सेनही त्यात मागे नाहीत. त्यांनी आपल्या आणि वडिलांच्या नावे जमीन भाडेपट्ट्याने करून घेतली आहे. 2006 मध्ये त्यांनी ही जमीन नावावर करून घेण्यासाठी विद्यापीठाशी पत्र व्यवहार केला आणि अतिरिक्त जमीन परत केली नाही. मूळात विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार १२५ डेसीमल जमीन डॉ. अमर्त्य सेन यांच्या वडिलांना १२५ वऱ्षांच्या भाडेतत्वावर दिली होती. अमर्त्य सेन यांच्या त्या व्यतिरिक्त १३ डेसीमल जमीन ताब्यात आहे.

यावर विद्यापीठाचे म्हणणे असे की, सेन यांना चांगलेच ठाऊक आहे की विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात जमीन अनधिकृतपणे त्यानी ताब्यात घेतली आहे. “एका इस्टेट अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, कॅम्पसजवळ भूखंड विकल्यामुळे सेन कुटूंबाला फायदा झाला आहे.”

त्यावर अमर्त्य सेन यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठाच्या अहवालातून दिसून आले आहे की, विश्वभारतीचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती‘ हे कॅम्पसमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या भूभागावरील अनधिकृत कब्जा हटवण्याच्या ’व्यवस्थेमध्ये व्यग्र आहेत आणि माझे नाव देखील व्यापार्‍यांच्या यादीत देण्यात आले आहे. आमचे घर असलेली विश्वभारती ही जमीन दीर्घकालीन भाडेपट्टीवर असून ती आता कालबाह्य होणार नाही. पण कुलगुरू आपल्याला पाहिजे असलेल्या कोणालाही हुसकावून लावण्याचे नेहमीच स्वप्न पाहू शकतात.

Amartya Sen on Vishva-Bharati list of ‘illegal plot holders

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील आता अमर्त्य सेन यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. अमर्त्य सेन यांनी भाजप सरकारला अनुकूल ठरतील, अशी मते मांडलेली नाहीत म्हणून त्यांच्यावर जमीन बळकावण्याचे आरोप केले जात आहेत, असा दावा ममतांनी केला आहे.

विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी समारंभ कार्यक्रमाच्याच दिवशी या वादाला तोंड फुटण्यामागेही निश्चित राजकीय कारण आहे. ते थेट तृणमूळ काँग्रेस विरूद्ध भाजप या राजकीय भांडणाशी जोडले गेले आहे. पण या निमित्ताने अमर्त्य सेन यांचे १३ डेसीमल जमीन कब्जात ठेवण्याचे प्रकरण उजेडात आले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण