कॉंग्रेस पक्षाच्या असलेल्या छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षा किरणमयी नायक यांनीच महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला आपल्या मजीर्ने प्रेमसंबंध बनवतात, नंतर बलात्कार सारखा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
रायपूर : कॉंग्रेस पक्षाच्या असलेल्या छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षा किरणमयी नायक यांनीच महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला आपल्या मजीर्ने प्रेमसंबंध बनवतात, नंतर बलात्कारसारखा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल करतात, असे त्यांनी म्हटले आहे. Chhattisgarh Women’s Commission Chairperson kiranmayee nayak news
महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. मात्र, तरीही नायक यांनी महिलांनाच सल्ला देताना म्हटले आहे की, महिलांनी प्रेमसंबंध करताना काळजी घ्यावी. समोरची व्यक्ती चांगली आहे की वाईट याची शाहनिशा करुन घ्यावी. चुकीच्या लोकांशी रिलेशनशिप ठेवल्याचे परिणाम वाईट होतात, असं नायक म्हणाल्या.
महिलांनी लव्ह जिहाद पासून सावध राहिलं पाहिजे. मुलींना स्वत:ला समजायला हवं की, एखादा विवाहित पुरुष प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना आनंदी ठेवूच शकत नाही. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलींना पोलिसांकडे जावेच लागते. बऱ्याचदा मुली आपल्या इच्छेनुसार प्रेमसंबंध बनवतात आणि लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर जेव्हा समोरची व्यक्ती धोका देतो तेव्हा मुली बलात्काराचा गुन्हा दाखल करतात, असे नायक म्हणाल्या.
नायक यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठत आहे. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष शालिनी राजपूत आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा हर्षिता पांडेय म्हणाल्या की, एक महिला दुसऱ्या महिलांबाबत असे वक्तव्य करणाऱ्या नायक यांनी महिलांची माफी मागायला हवी. नायक यांच्या वक्तव्यावरूनच हेच दिसते की त्यांना म्हणायचे आहे की नेहमीच महिला चुकीच्या असतात. एखाददुसऱ्या घटनेवरून सगळ्याच महिलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही.
अजित जोगी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अनामिका पाल यांनी तर नायक यांच्या वक्तव्याला लज्जस्पद म्हटले आहे. त्यांना राज्य महिला आयोगासारख्या संस्थेवर एक मिनिटही राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App