कॉंग्रेस स्वत:ही हारली, मित्रांनाही हरविले, चिडलेल्या बीटीपीच्या दोन आमदारांनी पाठिंबा घेतला काढून


राजस्थानमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे पानिपत झाले. यामध्ये कॉंग्रेस स्वत: तर हारलीच; पण मित्रपक्षांनाही हरविले. त्यांना मदत केली नाही. त्यामुळे चिडलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीच्या (बीटीपी) दोन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.


विशेष प्रतिनिधी

जयपूर : राजस्थानमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत कॉंग्रेसचे पानिपत झाले. यामध्ये कॉंग्रेस स्वत: तर हारलीच; पण मित्रपक्षांनाही हरविले. त्यांना मदत केली नाही. त्यामुळे चिडलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीच्या (बीटीपी) दोन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

Congress loses rajasthan two angry BTP MLAs withdraw support

पंचायत निवडणुकात आम्हाला व आमच्या समर्थकांना काँग्रेसने मदत केली नाही, असा बीटीपीच्या राजकुमार रोट व रामप्रसाद या दोन आमदारांचा आरोप आहे. राजस्थानमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व सरपंच या दोन पदांसाठी अनुक्रमे २० जिल्हा परिषदा तसेच २२१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. त्यातील २० जिल्हा परिषदांत अध्यक्षपदासाठी भाजपचे १२, काँग्रेसचे ५ व तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले.



  • त्यामुळे राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे. राजस्थानात झालेल्या पंचायत निवडणुकात काँग्रेसला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर ही घडामोड झाली.

Congress loses rajasthan two angry BTP MLAs withdraw support

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरीची भूमिका घेतल्याने अशोक गेहलोत यांचे सरकार डळमळीत झाले होते. मात्र त्यावर मार्ग काढत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला. त्या वेळी बीटीपीच्या दोन आमदारांनी गेहलोत सरकारला समर्थन दिले होते. २०१८ पासून बीटीपीचे आमदार गेहलोत सरकारला पाठिंबा देत होते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात