देशाचे पंतप्रधान मोदी तुमचे नेते नाहीत? मग निघा कडेकडेने, रोहित सरधाना यांनी सुनावले

देशात काही जणांना मोदी नावाची इतकी काविळ झाली आहे की, एका व्यक्तीने टीव्हीवर तुमचे पंतप्रधान मोदी, असे म्हटले. यामुळे प्रसिध्द अँकर रोहित सरधाना यांनी त्या व्यक्तीला चांगलेच सुनावले. देशाचे पंतप्रधान मोदी तुमचे नेते नाहीत ना, तर मग निघा असे सरधाना यांनी फटकारले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात काही जणांना मोदी नावाची इतकी काविळ झाली आहे की एका व्यक्तीने टीव्हीवर तुमचे पंतप्रधान मोदी, असे म्हटले. यामुळे प्रसिध्द अँकर रोहित सरधाना यांनी त्या व्यक्तीला चांगलेच सुनावले. मोदी तुमचे नेते नाहीत ना, तर मग निघा असे सरधाना यांनी फटकारले आहे. Prime Minister Modi is not your leader? said Rohit Sardhanaशेतकरी आंदोलनामध्येही काही जण धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज तक या वृत्तवाहिनीचे अँकर रोहित सरधाना आपल्या कार्यक्रमात काही पत्रे वाचत होते. यामध्ये एका व्यक्तीने लिहिले होते की शेतकरी खलिस्थानवादी आहेत तर तुमचा नेता मोदी त्यांना जेलमध्ये का टाकत नाही. यावरून सरधाणा चांगलेच चिडले.

Prime Minister Modi is not your leader? said Rohit Sardhana

ते म्हणाले की, शौकत अली….पहिली गोष्ट म्हणजे मोदी तुमचेही नेते आहेत. ते तुम्हाला मान्य नसेल तर मग इथून कडेकडेने निघा. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आंदोलन खलिस्थानवाद्यांचे आहे, असे कधीही म्हटलेले नाही. परंतु, जर कोणी शेतकरी आंदोलनाच्या आडून खलिस्थानवाद्यांचा झेंडा फडकावित असेल तर त्यांच्याविरुध्द कारवाई करायची नाही का? त्यांना अटक करायची नाही का? शाहिनबागमधील तुमच्या आंदोलनात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. शेतकरी आंदोलनातही हे होऊन द्यायचे का?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*