BREAKING NEWS : भावपूर्ण श्रद्धांजली ! अनाथांची माय गेली ; सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन


 विशेष प्रतिनिधी

पुणे: अनाथांची माय भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी  त्यांचे निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्या होत्या.महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने  त्यांचे निधन झाले.BREAKING NEWS: A heartfelt tribute! The orphans mother Sindhutai Sapkal dies in Pune

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली.

आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं.

BREAKING NEWS: A heartfelt tribute! The orphans mother Sindhutai Sapkal dies in Pune

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात