SINDHUTAI SAPKAL:अनाथांची आई सर्वांची लाडकी माई ! पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक;वाहिली श्रद्धांजली …


सगळ्याच दिग्गजांची आदरांजली

सिंधुताई सपकाळ यांना समाजातील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल, नारी शक्ती पुरस्कारासह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून 900 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

पुणे:अनाथांची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रख्यात समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी निधन झाले. सिंधुताई सपकाळ ह्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या . त्यांनी आतापर्यंत 2,000 अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्याहून अधिक मुलांच्या त्या आजी..Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, समाजासाठी त्यांनी केलेल्या या उदात्त सेवेबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल, असे म्हटले आहे.

“डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी स्मरणात राहिल. तिच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकली. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्ये खूप काम केले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती…

 

 

अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. दरम्यान, वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहेत.

 

पियुष गोयल यांनी देखील ट्विट करत माईंचे स्मरण केले आहे…

https://twitter.com/PiyushGoyal/status/1478436437347364864?s=20

नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे.

विजया रहाटकर यांनी देखील सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणतात…

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली…

छत्रपती उदयनराजे भावूक…

पंकजा मुंडे ..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे ट्विट…

पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. … खरंच दुःखद घटना

पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा, सगळ्यांची माय सिंधुताई सपकाळ आज आपल्यात नाहीत. … खरंच दुःखद घटना

 

Sindhutai Sapkal will be remembered for her noble service to society: PM Modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*