काश्मीर खोऱ्यात उतरलेली भाजपची टीम होती तरी कोण?; आणि तिने नेमके केले तरी काय?, त्यांना मिळणार काय?


  • केंद्रीय आणि राज्य स्तरीय नेत्यांचा साधला अनोखा संगम

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मूमध्ये हिंदूबहुल भागात भाजपचा नेहमी बोलबाला राहिला आहे. पण शेजारच्या काश्मीर खोऱ्यात भाजपला फारसा शिरकाव करता आला नव्हता. श्रीनगरमधील गुपकार रोडवरच्या काश्मिरी राजकीय घराण्यांच्या गुपकार रोडवरूनच काश्मीर खोऱ्यातील राजकारण हलविले जात होते. पण ३७० हटविल्यानंतर गुपकार रोडचा ध्रुवतारा ढळला आहे. who was bjp team in kashmir?, what did they do?

अगदी डीडीसीच्या निवडणूकीत ७ पक्षांच्या गुपकार गटाला मोठे यश मिळाले असले तरीही. कारण आता काश्मीर खोऱ्यात भाजपचा दमदार शिरकाव झालेला आहे. आणि हा सहज सोपा झालेला नाही. मोदी – शहांच्या भाजपची टीमने तेथे अथक मेहनत घेतली आहे. who was bjp team in kashmir?, what did they do?

किंबहुना डीडीसीची निवडणूक अतिशय सिरियसली घेऊन नियोजन केले होते. माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, अनुराग ठाकूर, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, खासदार जफर इस्लाम, सुफी गायक आणि वाल्मिकी समाजाचे नेते खासदार हंसराज हंस हे केंद्रीय नेते जम्मू बरोबरच काश्मीर खोऱ्यातही नियोजनपूर्वक प्रचार करत होते.

पाकिस्तानातून निर्वासित होऊन आलेल्या वाल्मिकी समाजाला काश्मीरमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामे देण्यात आली. पण त्यांना मताचा अधिकार नव्हता. डीडीसीच्या निवडणुकीत प्रथमच हा मतदानाचा अधिकार वाल्मिकी समाजाला देण्यात आला. हंसराज हंस हे या समाजाचे प्रतिनिधी काश्मीर खोऱ्यातील प्रचारात आघाडीवर होते. या सगळ्यांनी खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकला होता.

प्रचाराबरोबरच या सगळ्या नेत्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी काश्मीर खोऱ्यात त्यांनी बजावली आहे आणि तिचा फारसा प्रसार माध्यमे उल्लेख करत नाहीत, ती म्हणजे भाजपच्या स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी या नेत्यांनी काही महिन्यांमध्ये कष्टपूर्वक उभी केली आहे. कै. प्रमोद महाजन त्याला राजकीय क्लस्टर बाँम्बिंगची पूर्वतयारी असे म्हणायचे. याचा अर्थ पक्षाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू करण्यापूर्वी कार्यकर्त्यांची आक्रमक मानसिक चार्जिंग झाले पाहिजे, असे ते म्हणायचे.

मोदी – शहांच्या भाजपमध्ये त्यालाच मूर्त स्वरूप आले आहे आणि वर उल्लेख केलेल्या केंद्रीय नेत्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष रवी रैना, तरूण चुग या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी अशी स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची चार्ज्ड जबरदस्त फळी उभी केली आहे. निवडणुकीतील यशापलिकडचे हे मोठे यश आहे, असे मानले पाहिजे.

who was bjp team in kashmir?, what did they do?

भाजपच्या दृष्टीने काश्मीर ते कन्याकुमारी पाया मजबुतीचा आणि विस्तारीकरणाचा हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याकडे पक्षाच्या वर उल्लेख केलेल्या नेत्यांनी तितक्याच सिरियसली पाहून तसे काम केले आहे.

यातून अनेकांची राजकीय कारकीर्द भविष्यात फुलणार आहे. त्यात शहानवाज हुसेन हे वाजपेयींच्या मंत्रिमंडळात असलेले नेते यांची कारकीर्द पुनरूज्जीवीत होण्याची शक्यता आहे. तसेच अन्य नेत्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. काश्मीरची निवडणूक भाजपला जो आत्मविश्वास देते आहे. तसाच ती काम करणाऱ्या नेत्यांच्या राजकीय करिअरला सुनिश्चित करीत आहे, असे म्हणण्यास वाव आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात