तिरंग्याची शान तर उंचावलीच; पण कमळाचा ध्वजही तोलून धरला; भाजपचा काश्मीर खोऱ्यात भू-राजनैतिक पायरोवा आणि विस्तार


  • अपक्षांनाही पाठिंबा देत आणले निवडून

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले, पण ते राज्याच्या राजकारणात विशेषतः काश्मीर खोऱ्यात भाजपचा पाया पक्का करणारे आणि विस्तार करणारे आहे, हे मात्र निश्चित. कारण ज्या पक्षाला खोऱ्यात अजिबात स्थानच नव्हते किंवा काश्मीर खोऱ्यात कोणी तिरंगा उचलायला मिळणार नाही, अशी दर्पोक्ती गुपकारचे नेते करत होते, तेथेच काश्मिरी जनतेने तिरंगा तर उंच उचलून धरलाच पण कमळाचा ध्वजही हातात तोलून धरल्याचे स्पष्ट झाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपच्या कमळ चिन्हावर तीन उमेदवारांनी यश मिळवलेय आणि यात एक महिला आहे. BJP’s geopolitical in Kashmir Valley

भाजपने काश्मीरची निवडणूक फार सिरियसली आणि स्ट्रॅटेजीने लढवली. मोदी – शहांचा भाजप हा स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशनवर निवडणूक लढवतो, याचा प्रत्यय काश्मीरमध्येही आला. भाजपने केंद्रीय नेत्यांची टीमच काश्मीरमध्ये असाइन्मेंट देऊनच उतरवली होती. त्यात शहानवाज हुसेन होते, पंतप्रधान कार्यालयालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह होते. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, खासदार जफर इस्लाम, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, काश्मीरचे तरूण चुग हे नेते काश्मीर खोऱ्यात तळ ठोकून प्रचार करत होते. BJP’s geopolitical in Kashmir Valley

जेथे भाजपचा झेंडा पोहोचलाच नव्हता. किंवा कोणाची तो झेंडा उचलायची हिंमतच नव्हती अशा जिल्ह्यांमध्येही भाजपचा प्रचार या नेत्यांनी केला. कार्यकर्त्यांची पहिली फळी या निमित्ताने उभी करण्यात या नेत्यांना यश आले. इतर पक्षांच्या दृष्टीने नव्हे, तर भाजपच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची राजकीय बाब आहे.

भाजपचा हा काश्मीर खोऱ्यात भूराजनैतिक विस्तार आहे. ३७ BJP’s geopolitical in Kashmir Valley० कलम हा अडथळा वर्षभरापूर्वीच दूर केल्यानंतर भाजपने केलेल्या कामाला हे मर्यादित यश मिळाले आहे. मग भले भाजपचे ३ उमेदवार निवडून आले असतील. पण ते बांदीपोरा, काकापोरा, बलहामा येथे निवडून आल्याने भाजपच्या विजयाचे महत्त्व अधोरेखित होते आहे. कारण एकेकाळी प्रचंड दहशतवादाचा सामना केलेल्या या परिसरात भाजपचे नाव घेण्याचीही कोणाची हिंमत नव्हती. तेथे फक्त दहशतवाद्यांची मर्जी संभाळणाऱ्या म्हणजे पीडीपी किंवा नॅशनल कॉन्फरन्सचीच चलती होती. तेथे भाजपच्या ३ उमेदवारांनी विजय मिळविला आहे. हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.

BJP’s geopolitical in Kashmir Valley

भाजपने आणखी एका स्ट्रॅटेजीने काश्मीर खोऱ्यात नुसता शिरकावच केला नाही, तर पायरोवा केला आहे, तो म्हणजे खोऱ्यातील ६० अपक्ष उमेदवारांना पक्षाने पाठिंबा दिला आहे. यापैकी २४ उमेदवार एकतर निवडून आले आहेत किंवा ते आघाडीवर तरी आहेत. भाजपच्या स्ट्रॅटेजीचे हे सर्वांत मोठे यश मानले पाहिजे. कारण ज्यांना भाजपचे थेट नाव नको आहे, त्यांच्यासाठी एक प्रकारे भाजपने स्वतःहून पुढाकार घेऊन राजकीय पर्याय उपलब्ध करवून दिला. आणि ज्या २४ आकड्यांमध्ये त्या पर्यायाने अर्थात भाजप पुरस्कृत उमेदवारांनी यश मिळविले आहे, तोही काश्मीर खोऱ्यात वेगळ्या प्रकारचा भाजपचा भूराजनैतिक पाया विस्तारच मानला पाहिजे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण