BJP-SHIVSENA Together:औरंगाबाद-दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रावसाहेब दानवेंना भावी सहकारी म्हणाले अन्….भाजप-शिवसेना पुन्हा येणार एकत्र ?


  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून त्यांना भावी सहकारी म्हटलं. यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नेते युतीबाबत भाष्य करत आहेत.
  • मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भावी सहकारी असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता भाजप-शिवसेनमध्ये नेमकं चाललंय अशी चर्चा रंगली आहे
  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला

विशेष प्रतिनिधी 

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका जाहीर कार्यक्रमात ‘भावी सहकारी’ असा उल्लेख करत भाजपला खुणावलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवेंचा’भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.BJP-SHIVSENA Together: In Aurangabad, Chief Minister Uddhav Thackeray called Raosaheb Danve a future colleague and … will BJP-Shiv Sena come together again?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला युतीसाठी इशारा तर केला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून त्यांना भावी सहकारी म्हटलं. यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नेते युतीबाबत भाष्य करत आहेत. शिवसेना नेते आणि महसूल मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी शिवसेना भाजप युतीचे स्पष्ट संकेत दिले.

शिवसेना भाजप एकत्र आले तर मतदारांना आनंद होईल असं रावसाहेब दानवे म्हणाले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी आहे, असं शिवसेना नेते आणि महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. दोघेही औरंगाबादेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांकडून दोनदा ‘भावी सहकारी’ असा उल्लेख

मुख्यमंत्र्यांनी भाजपला खुणावल्याची जोरदार चर्चा सुरु असताना अवघ्या काही तासात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘भावी सहकारी’ असा उल्लेख करुन या विषयाला अधिक हवा दिली आहे.

पाहा पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:

आपण कार्यक्रमात भावी सहकारी असा उल्लेख केला असा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अर्थ म्हणजे तोच आहे की, माझे आजी-माजी सहकारी तिथे होते. उद्या सगळे एकत्र आले तर भावी पण होऊ शकतात. आता ते एकत्र येतील तेव्हा कळेल की भावी सहकारी कोण. येणारा काळच काय ते ठरवेल.’

‘गंमतीजमतीचा भाग सोडा.. माझं प्रामाणिक म्हणणं असं आहे की, राजकारण एका पातळीवर करा त्याला विकृत स्वरुप येता कामा नये. हल्ली जरा जे विकृत स्वरुप येतंय ते थांबलं पाहिजे.’

‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. पण शेवटी आम्ही सगळे या मातीतील आहोत. त्यामुळे आपआपल्या पदाचा अंहकार न ठेवता आपल्या पदाचा राज्यासाठी काय उपयोग करुन घेता येईल हे राजकारण बाजूला ठेवून पाहिलं जावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनाकडून दोनदा भावी सहकारी असा भाजपच्या नेत्यांचा उल्लेख होत असल्याने राज्यातील राजकारण नेमकं कोणत्या दिशेने वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

BJP-SHIVSENA Together: In Aurangabad, Chief Minister Uddhav Thackeray called Raosaheb Danve a future colleague and … will BJP-Shiv Sena come together again?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात