BJP MLA G Shekhar in Karnatka speaks how missionaries are converting people in rural areas in the name of healing

झळ धर्मांतराची : कर्नाटकच्या हिंदू आमदाराने सांगितली व्यथा, आईने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, हिलिंगच्या नावाखाली मिशनऱ्यांकडून खेडुतांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू!

BJP MLA G Shekhar : काही दिवसांपूर्वी तुम्ही केरळ, यूपीच्या काही बातम्या पाहिल्या असतील. धर्मांतरामुळे तेथील राज्य सरकारनेही सतर्क आणि त्रस्त झाली आहेत. आता कर्नाटक विधानसभेने अलीकडेच राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जबरदस्तीने धर्मांतरावर जोरदार चर्चा केली. यावेळी एका हिंदू आमदाराने मिशनऱ्यांनी त्यांच्या स्वत:च्या आईचे कसे ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर घडवले याच्या वेदना सर्वांसमोर मांडल्या. हा प्रसंग सर्वांचेच डोळे उघडणारा आहे. BJP MLA G Shekhar in Karnatka speaks how missionaries are converting people in rural areas in the name of healing


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : काही दिवसांपूर्वी तुम्ही केरळ, यूपीच्या काही बातम्या पाहिल्या असतील. धर्मांतरामुळे तेथील राज्य सरकारनेही सतर्क आणि त्रस्त झाली आहेत. आता कर्नाटक विधानसभेने अलीकडेच राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जबरदस्तीने धर्मांतरावर जोरदार चर्चा केली. यावेळी एका हिंदू आमदाराने मिशनऱ्यांनी त्यांच्या स्वत:च्या आईचे कसे ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर घडवले याच्या वेदना सर्वांसमोर मांडल्या. हा प्रसंग सर्वांचेच डोळे उघडणारा आहे.

माजी मंत्री आणि भाजपाचे विद्यमान आमदार गुलीहट्टी शेखर यांनी मंगळवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला की, ख्रिश्चन मिशनरी कशा प्रकारे लोकांना मूर्ख बनवत आहेत. त्यांना भीती, आमिष आणि अंधश्रद्धेसह विविध पद्धतींनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित केले जात आहे.”

मिशनऱ्यांना विरोध करणाऱ्यांवर खोट्या केसेस

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमदार म्हणाले की, ग्रामीण भागात मिशनरी आणि चर्चेसचा प्रभाव मजबूत आहे, एवढा की एखाद्याने त्यांच्याविरुद्ध ब्र उच्चारला तरी त्याला रेप आणि छळासारख्या खोट्या केसेसमध्ये अडकवले जाते.

मिशनऱ्यांनी ब्रेनवॉशिंग करून धर्मांतर घडवले

आमदारांनी पुढे खुलासा केला की, त्यांच्या स्वतःच्या आईने मिशनऱ्यांमुळे प्रभावित होऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. गुलीहट्टी शेखर यांनी सांगितले की, मिशनऱ्यांनी आईला कपाळावर कुंकू किंवा टिळा लावू नये असे सांगितले आहे. आईची एवढी प्रभावी ब्रेनवॉशिंग करण्यात आली आहे की, ती आता हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींकडेही पाहू इच्छित नाही, असेही ते म्हणाले.

जी. शेखर पुढे म्हणाले की, मिशनरी हे भोळ्याभाबड्या लोकांना आजार आणि अपंगत्व बरे करण्याच्या नावाखाली मूर्ख बनवतात. त्यांच्या आईला त्यांच्या घराशेजारी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रथम प्रार्थनेला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. हळूहळू त्यांचा प्रभाव इतका वाढला की त्यांच्या आईने हिंदू देवांची पूजा करणे बंद केले, त्यांच्या फोनची रिंगटोन ख्रिश्चन प्रार्थनेत बदलली आणि घरातल्या हिंदू धार्मिक पद्धतींवर आईने आक्षेप घेण्यास सुरुवात केली.”

आईच्या धर्मांतरामुळे घरगुती समस्या वाढल्या

आमदार म्हणाले की, त्यांना आता घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, कारण त्यांच्या आईला त्यांच्या घरात हिंदू देवतांची पूजा करायची नाही. जर त्यांनी त्यांच्या आईच्या ख्रिश्चन प्रवृत्तीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबातील हिंदू प्रथा पाळण्याचा आग्रह धरला, तर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, असेही आमदार म्हणाले.

आमदार जी. शेखर म्हणाले, “होसादुर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. अलीकडे सुमारे 20,000 लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की मिशनरी प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाला लक्ष्य करतात आणि जर कोणत्याही हिंदू गट किंवा व्यक्तींनी रोखण्याचा प्रयत्न केला तर ते बलात्कार आणि जातीय अत्याचाराच्या खोट्या प्रकरणांमध्ये अडकवत आहेत.

काँग्रेसचा आक्षेप, तर गृहमंत्र्यांचा प्रतिसाद

काँग्रेस नेते केजे जॉर्ज यांनी सर्व ‘चर्च’वर आरोप करण्यावर आक्षेप घेतला आणि सांगितले की, काही चर्चच्या चुकीसाठी सर्व चर्चना सरसकट आरोपी करणे योग्य नाही. त्यांच्या आक्षेपाला सभापतींनी पाठिंबा दिला. जी. शेखर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले की, धर्मांतरासाठी आमिष, भीती किंवा धमकी वापरणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि राज्य कायदेशीररीत्या या समस्येला सामोरे जाईल. मंत्री म्हणाले की, असे आढळून आले आहे की राज्यात मिशनऱ्यांचे एक मोठे नेटवर्क कार्यरत आहे. राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे थांबवण्यासाठी एक योजना आणणार आहे.

BJP MLA G Shekhar in Karnatka speaks how missionaries are converting people in rural areas in the name of healing

महत्त्वाच्या बातम्या