Maharashtra Schools Reopen From 4th October, 5th to 12th classes in rural areas and 8th to 12th classes in urban areas permitted

शाळा सुरू होणार : ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात ५वी ते १२वी, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार

Maharashtra Schools Reopen From 4th October : राज्यातील कोरोनाच्या आटोक्यात आलेल्या परिस्थितीनंतर आता राज्य शासनाने लवकरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मुले शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती गरजेची आहे. याशिवाय शारीरिक अंतराचं पालनही अनिवार्य असणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 4 ऑक्टोबरपासून निवडक वर्गांकरिता शाळा सुरू करण्याची परवानगी देत असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. Maharashtra Schools Reopen From 4th October, 5th to 12th classes in rural areas and 8th to 12th classes in urban areas permitted


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या आटोक्यात आलेल्या परिस्थितीनंतर आता राज्य शासनाने लवकरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, मुले शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती गरजेची आहे. याशिवाय शारीरिक अंतराचं पालनही अनिवार्य असणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 4 ऑक्टोबरपासून निवडक वर्गांकरिता शाळा सुरू करण्याची परवानगी देत असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं.

शासनाने जुलै महिन्यात शासनादेश काढून ग्रामीण भागात 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय तेव्हाच 5 वी ते 8 च्या शाळाही सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. परंतु टास्क फोर्स, शिक्षणतज्ज्ञ यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. आता मात्र टास्क फोर्सकडून नव्या सूचना मिळाल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागात 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग

शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याआधी त्यासंबंधांतील मार्गदर्शक सूचना लवकरच शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.

कोरोनाचे नियम पाळून शाळा, पालकांची समंती गरजेची

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराचे पालन करून शाळा सुरू होणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती गरजेची असेल. ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू नये, असेही त्या म्हणाल्या.

दिवाळीनंतर महाविद्यालयांचा मुहूर्त?

शाळा सुरू होत असल्या तरी महाविद्यालये सुरू होण्याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यावर महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. पुण्यात एका कार्यक्रमावेळी बोलताना उदय सामंत म्हटले होते की, राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतर उघडण्याचा विचार सुरू आहे.

Maharashtra Schools Reopen From 4th October, 5th to 12th classes in rural areas and 8th to 12th classes in urban areas permitted

महत्त्वाच्या बातम्या