मनी मॅटर्स : जादा उत्पादनासाठी नेहमी जोड व्यवसायाचा विचार करा


आपल्या सर्वांनाच खूप खूप पैसे कमवायचे असतात. पण त्यासाठी नक्की काय करावे याबाबत मनात गोंधळ असतो. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग करायला हवा. स्वत:च्या ख-या गरजा ओळखा. आपण उत्साहाच्या भरात कधी कधी अनावश्यक गोष्टींचीही खरेदी करतो. हे टाळण्यासाठी महिन्याच्या जमाखर्चाचे अंदाजपत्रक बनवणे व त्याप्रमाणे खर्च करणे हा एक उपाय आहे. ब-याच जणांना आर्थिक नियोजन कंटाळवाणे वाटते किंवा आहेच किती उत्पन्न, बचत असाही विचार केला जातो.Always consider a pairing business for extra production

कर भरायच्या वेळेसच अनेक जण आर्थिक सल्ला घेतात. जर योग्य नियोजन असेल तर थोड्या उत्पन्नातही मोठी गुंतवणूक होऊ शकते. त्याआठी नेहमी जोडव्यवसाय करायचा विचार करा. आपली नोकरी, व्यवसाय याशिवाय जिथे तुमची उपस्थिती आवश्यक नसेल असा एखादा जोडव्यवसाय करा. नेहमी दुस-या पिढीतील उत्पन्न वापरा. तुमचा पगार हे पहिल्या पिढीतील उत्पन्न मानले तर त्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे दुस-या पिढीतील उत्पन्न होय.

त्यासाठी योग्य ठिकाणी गुतंवणूक करणे अतिशय गरजेचे असते. कारण जर तरुणपणापासून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्याचा परतावा जेव्हा मिळण्याची आवश्यकता असते त्यावेळी तो मिळू लागतो. त्यावर मघ आपल्याला काही योजना आखता येतात व पूर्ण करता येतात. जर तुम्हाला पेसै बाजूला ठेवता येत नसतील तर किंवा ते जर शिल्लक रहात नसतील तर आपले आर्थिक नियोजन कोठे चुकत आहे हे तपासा.

समजा मिळकत कमी व खर्च जास्त असेल तर दरवेळी खर्चात करात करून मार्ग निघत नाही. त्यासाठी आर्थिक उत्पन्नवाढीचे मार्ग शोधा. त्यावर तातडीने अंमलबजावणी करा. त्यातून जे काही जादाचे पैसे हाती येतील ते योग्य ठिकाणी गुंतवा. त्यानुसार आपले आर्थिक नियोजनही बदला. कमी खर्च व जादा बचत यावर आर्थिक नियोजनात भर ठेवा.

Always consider a pairing business for extra production

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात