5G : देशातील 5G नेटवर्कच्या विरोधात जुही चावलाची कोर्टात धाव ; 2 जून रोजी सुनावणी


भारतामध्ये सध्या 4G नेटवर्क आहे. पुढील काही वर्षांत 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करण्यात आली.5G: Juhi Chawla goes to court against 5G network in the country; Hearing on June 2


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिने देशातील 5G नेटवर्कच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. जुही चावला तिच्या सामाजिक उपक्रमांसाठीही ओळखली जाते.


वृत्तसंस्था

मुंबई : 5G टेक्नोलॉजीच्या विरुद्ध अभिनेत्री जुही चावलाने याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टात यावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. जुही चावलाने मागील अनेक वर्षांपासून याच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. 5G टेक्नोलॉजीची रेडियोफ्रिक्वेंसीमुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे याला रोखले पाहिजे.5G: Juhi Chawla goes to court against 5G network in the country; Hearing on June 2

देशात 5G तंत्रज्ञान आणलं जातं आहे. त्यासाठीची चर्चा सुरू असतानाच जुही चावलाने कोर्टात धाव घेतली आहे. या सगळ्यामुळे पर्यावरणावर परिणाम होईल असं जुही चावलाने म्हटलं आहे.

जुही चावला अनेक दिवसांपासून 5जी टॉवरच्या विरोधात जनजागृती करत आहे. जुही चावलाच्या याचिकेला दुसऱ्या खंडपीठाकडे देण्यात आले आहे. जुहीची मागणी आहे की, या टेक्नोलॉजीला परवानगी देण्याआधी सर्व गोष्टी बारकाईने तपासून घेतल्या पाहिजे. ज्यामुळे याचा मनुष्य आणि इतर जीवांवर तसेच पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही.

5 जी टेक्नोलॉजी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. जुहीने याचिकेमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की, या टेक्नोलॉजीवर योग्य ते संशोधन झालं आहे का? येणाऱ्या पीढीसाठी हे सुरक्षित आहे का?

काय म्हणाली जुही ?

देशात 5 जी तंत्रज्ञान लागू करण्याच्या आधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनांवर बारकाईने विचार केला पाहिजे त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी. ही टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याचा निर्णय घ्यावा असं जुही चावलाने म्हटलं आहे.

कोणतंही अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्या विरोधात मी नाही. उलट यामधून निर्माण होणाऱ्या नव्या उत्पादनांचा लाभही आपण घेत असतो. यामध्ये वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. पण उपकरणांच्या वापराबाबत आपण आजही गोंधळलेलो आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच शोधातून हे लक्षात येतं की अशा प्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हानीकारक आहेत.

भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी RF रेडिएशनमुळे महिला, पुरूष, लहान मुलं, बालकं, जनावरं, जीव जंतू, झाडं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचं योग्य प्रकारे संशोधन करण्याची आवश्यकता आहे. झालेल्या किंवा होणाऱ्या संशोधनांचा अहवाल हा जाहीर करण्यात यावा. हे तंत्रज्ञान भारतातल्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही? हे स्पष्ट केलं जावं आणि त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी लागू करण्याचा विचार व्हावा असं जुही चावल्याच्या प्रवक्त्यानेही म्हटलं आहे.

5G: Juhi Chawla goes to court against 5G network in the country; Hearing on June 2

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात