योगी कधी शिकणार उद्धवजीकडून ‘कार्यक्षमता’…?


उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंच्या हत्येचे प्रकरण बाहेर येताच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून त्यांच्या पाठिशी उभे आहोत म्हणून सांगितले आणि पालघरला जशी दोन साधूंच्या हत्येनंतर ‘कठोर कारवाई’ केली तशीच आपण कराल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी यांच्याकडे व्यक्त केली. किती जबरदस्त कार्यक्षमता आणि साधू समाजाबद्दल किती कळवळा? खरच उद्धव ठाकरे हे ‘त्रिगुणी’ मुख्यमंत्री आहेत ना!


विनय झोडगे

उद्धव ठाकरे किती जबरदस्त कार्यक्षम आणि उदारमतवादी मुख्यमंत्री आहेत ना..! पटत नाही…?? मग हे उदाहरण पाहा… उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधूंच्या हत्येचे प्रकरण बाहेर येताच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून आपण त्यांच्या पाठिशी उभे आहोत म्हणून सांगितले. आणि महाराष्ट्रात पालघरला जशी दोन साधूंच्या हत्येनंतर कठोर कारवाई केली तशीच आपण कराल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी यांच्याकडे व्यक्त केली.

किती जबरदस्त कार्यक्षमता आणि साधू समाजाबद्दल किती कळवळा? आणि त्याचवेळी कोणी साधूंच्या हत्येला धार्मिक रंग देऊ नये म्हणून व्यक्त केलेली काळजी…!! खरच उद्धव ठाकरे हे “त्रिगुणी” मुख्यमंत्री आहेत ना…!!

म्हणजे बघा पालघरच्या सेक्युलर लिचिंगच्या घटनेनंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करून या प्रकरणाची तपशीलवार माहिती दिली. तो पर्यंत एकदाच फक्त एकदाच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वक्तव्य आले होते. मीडियाने या सेक्युलर मॉब लिंचिंगच्या विडिओ क्लीप दाखवायला सुरवात केल्यानंतर प्रशासन जागे झाले.

गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केले. महाराष्ट्र सरकारकडून साधूंच्या हत्येचा स्पष्ट शब्दांत निषेध करण्यापूर्वीच “या हत्याकांडाला कोणी धार्मिक रंग देऊ नये.” चा धोशा सुरू झाला होता. नंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे फेसबुकवर लाइव्ह आले. पालघर हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि “त्रिगुणी” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशी “कार्यक्षमता” दाखविली.

आता उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ यांना फोन करून “अशाच कार्यक्षमतेची” अपेक्षा केली आहे की काय, हे समजायला मार्ग नाही…. कारण बुलंदशहरमधील साधूंच्या हत्येतील आरोपी दुसऱ्याच दिवशी पकडले गेलेत.

आरोपींनी नशेच्या अमलाखाली हे कृत्य केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. खरेच त्याला धार्मिक रंग देण्याची गरज नाही, हे देखील पोलिस तपासातून पुढे आले आहे… हे कसे काय घडले…?? दुसऱ्याच दिवशी आरोपी कसे काय पकडले गेले? योगींनी घाई गडबड केली काय? उद्धव ठाकरे यांच्या सारखी “कार्यक्षमता” योगींना दाखवता आली नाही काय? बरोबर हे प्रश्न योगींना विचारलेच पाहिजेत…!! नसती घाई गडबड करतात. डॉक्टर, नर्सवर थुंकणाऱ्या तबलिगींवर कारवाई करतात…!!

त्यांना समजत नाही… मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर बसल्यानंतर “कार्यक्षमता” दाखवायची असते. कोणत्याही घटनेनंतर तीन दिवसांनी फेसबुक लाइव्ह करायचे असते. मुख्य म्हणजे कोणत्याही घटनेला अजिबात धार्मिक रंग द्यायचा नसतो…!! मग कोरोनाचे हॉटस्पॉट मुंब्रा, मालेगाव, औरंगाबाद हे ठरले तरी…!! स्वत:चे राज्य सोडून दुसऱ्याच्या राज्यात लक्ष घालायचे असते…!! अगदी म्हणजे अगदीच योगींना काही समजत नाही…!! हेच खरे…!!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात