कम्युनिस्ट सरकारविरोधात कामगारांचा एल्गार, सरकारी दडपशाहीविरोधात किटेक्स ग्रुपच्या व्यवस्थापनाला कामगारांचा पाठिंबा


विशेष प्रतिनिधी

एनार्कुलम: कामगारांची लोकशाही म्हणविणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधाता आता कामगारांनीच एल्गार पुकारला आहे. कम्युनिस्ट सरकारकडून किटेक्स ग्रुपच्या होत असलेल्या छळवणुकीविरोधात कामगारांनी निषेध आंदोलन उभे केले आहे. व्यवस्थापनाला पूर्ण पाठिंबा देत कामगार रस्त्यावर उतरले आहेत.Workers ‘Elgar against communist government, workers’ support for Kitex Group’s management against government repression

केरळमधील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या किटेक्स गारमेंटस लिमिटेडची केरळमधील कम्युनिस्ट सरकारकडून छळवणूक केली जात आहे. एक महिन्यात या उद्योगावर दहा वेळ छापे घातले गेले. ४० ते ५० अधिकारी एकाच वेळी कारखान्यात प्रवेश करतात.



अनेक वेळा अगदी महिला कामगारांनाही त्रास देतात असा आरोप किटेक्स ग्रुपने केला होता. हे सरकार उद्योजकांना आत्महत्या करायलाच भाग पाडेल असे सांगत किटेक्स ग्रुपचे अध्यक्ष साबू जेकब यांनी केरळमध्ये सध्याच सुरू असलेले उद्योग सुरू ठेवणेच जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे आपली साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

कोची येथे गेल्या २६ वर्षांपासून किटेक्स ग्रुप काम करत आहेत. सुमारे दहा हजार कामगार येथे काम करतात. परंतु, तरीही केरळ सरकार सूडबुध्दीने वागत आहे. त्यामुळे आम्हाला कारखाना बंद करणे किंवा दुसऱ्या राज्यात हलविल्याशिवाय पर्याय नाही असेही जेकब यांनी सांगितले.

जेकब यांनी सांगितले, मी जवळजवळ तयार होतो आणि बहुतांश प्रकल्प अहवाल तयार होता. दुर्दैवाने मी पुढे जाऊ शकत नाही. यासाठी केरळ सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे. जर मी काही चूक केली असेल तर त्या सुधारण्यास मी तयार आहे.

त्गेल्या एक महिन्यापासून सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या फर्ममध्ये बेकायदेशीर तपासणी केली आहे. ते येथे येऊन त्रास देतात. केरळ उच्च न्यायालयात या संदर्भात स्थगिती असल्याने आम्ही किमान वेतन देत नाही असा चुकीचा आरोप आमच्यावर करत आहेत.

एका बाजुला सरकार कामगारांना किमान वेतन दिले जात नाही असे सरकारकडून म्हटले जात असले तरी कामगारांनी कंपनीच्या बाजूने आंदोलन करून सरकारच्या आरोपातील फोलपणा दाखविला आहे.

त्यामुळे सुमारे ९ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी ‘सेव्ह किटेक्स’ असे फलक देऊन सरकारविरुध्द आंदोलन केले. राज्य सरकारच्या विविध विभागांकडून कंपनीच्या कारभारात होणारा हस्तक्षेप संपुष्टात आला पाहिजे, असे आवाहन कामगारांनी केले आहे. या आंदोलनात महिला कर्मचाºयांचा सहभाग मोठा होता.

दरम्यान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातसह नऊ राज्यांनी आपले स्वीकृतीपत्र किटेक्सच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविले आहे. या कंपनीने आपल्या राज्यात येऊन गुंतवणूक करावी असे म्हटले आहे.

Workers ‘Elgar against communist government, workers’ support for Kitex Group’s management against government repression

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात