कम्युनिस्ट राज्य सरकारकडून छळवणूक, केरळमधील किटेक्स उद्योग समुहाचा साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा


विशेष प्रतिनिधी

तिरूअनंतपूरम : केरळमधील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या किटेक्स गारमेंटस लिमिटेडने केरळमधील कम्युनिस्ट सरकारवर छळवणुकीचा आरापे केला आहे. हे सरकार उद्योजकांना आत्महत्या करायलाच भाग पाडेल असे सांगत आपली साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.Harassment from communist state government, warning to withdraw Rs 3,500 crore investment from Kitex Group in Kerala

केरळ सरकारच्या वतीनेच कोची येथे २०२० रोजी आयाजित केलेल्या अ‍ॅसेंड ग्लोबल इन्हवेस्टर मिटमध्ये किटेक्स ग्रुपने केरळमध्ये साडेतीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. मात्र, किटेक्स ग्रुपचे अध्यक्ष साबू जेकब म्हणाले, केरळमध्ये सध्याच सुरू असलेले उद्योग सुरू ठेवणेच जिकिरीचे बनले आहे.याचे कारण म्हणजे केवळ एक महिन्यात आमच्या उद्योगावर दहा वेळ अधिकाऱ्यानी छापे घातले. ४० ते ५० अधिकाऱ्यानी एकाच वेळी कारखान्यात प्रवेश केला. अनेक वेळा झडत्या घेतल्या. अगदी महिला कामगारांनाही त्रास दिला. त्यांना काम करण्यापासून रोखले. धक्कादायक म्हणजे अधिकाºयांनी छापे घालण्यासाठी कोणतेही ठोस कारण दिले नाही. त्याचबरोबर कंपनीने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले हे देखील सांगितले नाही.

कोची येथे गेल्या २६ वर्षांपासून किटेक्स ग्रुप काम करत आहेत. सुमारे दहा हजार कामगार येथे काम करतात. परंतु, तरीही केरळ सरकार सूडबुध्दीने वागत आहे. त्यामुळे आम्हाला कारखाना बंद करणे किंवा दुसऱ्या राज्यात हलविल्याशिवाय पर्याय नाही असेही जेकब यांनी सांगितले.

केरळ सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, कॉँग्रेसचे नेते आमदार पी. टी. थॉमस म्हणाले, किटेक्स ग्रुपला बेकायदेशिर काम केल्याबद्दल पकडल्यावर अशा प्रकारचे आरोप करण्याची सवय लागलेली आहे. ते म्हणालेल लोकशाही आघाडीचे सरकार असताना तत्कालिन उद्योगमंत्र्यांनी कदंब्राययर प्रदुषणाबाबत दोन वेळा बैठका घेतल्या होत्या.

या दोन्ही बैठकांत किटेक्स ग्रुपचे मालक उपस्थित होते. यावेळी प्रदूषणाच्या प्रश्नावर सहा महिन्यांच्या आत प्रदूषणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळीही कंपनीने धमकी दिली होती की आमचा कारखाना श्रीलंकेला हलवू. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी हस्तक्षेप करून सांडपाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन घेतले होते.

Harassment from communist state government, warning to withdraw Rs 3,500 crore investment from Kitex Group in Kerala

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण