सोनियानिष्ठ सुशीलकुमार शिंदेचीही जी- २३ नेत्यांची भाषा , म्हणाले पक्षात संवाद, चर्चेची परंपरा संपुष्ठात, आत्मचिंतनाची गरज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर आणण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे, असे म्हणत आता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही कॉँग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.Sonia’s loyalist Sushilkumar Shinde also spoke the language of G-23 leaders, said ending the tradition of discussion, the need for introspection in congress

नाराज ज्येष्ठ नेत्यांच्या जी-२३ गटात आता चोवीसावे नेते म्हणून सुशीलकुमार शिंदेही सहभागी होत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंद हे निष्ठावान कॉँग्रेसजन आणि गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.



परंतु, आता त्यांनीही पक्षाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केलीआहे. पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे. मला याचे खूप दु:ख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे.

शिंदे म्हणाले, एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही. यावरून त्यांनी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या गटाला जी-२३ असे नाव देण्यात आले होते. या गटामध्ये कपिल सिब्बल, शशी थरूर, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या समावेश होता. पक्षाने आतापर्यंत या नेत्यांची नाराजी दूर केलेली नाही.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर सुशील कुमार शिंदे यांनी काही सांगितले असेल तर पक्षाने या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. कारण ते काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे.

Sonia’s loyalist Sushilkumar Shinde also spoke the language of G-23 leaders, said ending the tradition of discussion, the need for introspection in congress

हत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात