शिवसेनेबरोबर सत्तेच्या वाट्याचा इफेक्ट; सुशीलकुमारांसारखे काँग्रेस नेते हिंदुत्वावर बोलू लागले; किमान समान कार्यक्रमात हिंदुत्व शोधू लागले


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवसेनेबरोबर महाराष्ट्रातल्या सत्तेचा वाट्याचा इफेक्ट एवढा जबरदस्त आहे, की सुशीलकुमार शिंदेंसारखे वरिष्ठ काँग्रेस नेते हिंदुत्वावर बोलू लागलेत; नव्हे, नव्हे… ते किमान समान कार्यक्रमातच हिंदुत्व शोधू लागलेत… याचा प्रत्यय काल आला. मुंबईत बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या छत्रछायेखाली सर्वपक्षीय नेते एक आले होते आणि पुण्यातल्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदुत्वावर भाष्य केले.  shushilkumar shinde says, shivsena following true hindutva, kept BJP away from power

ते म्हणाले, की “शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाला मुरड घातली असे मला तरी वाटत नाही. कारण, किमान समान कार्यक्रम हा प्रबोधनकार ठाकरे यांनी वेगळ्या रुपाने आधी मांडलाच होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनी चांगली साथ देत भाजपाला सत्तेपासून त्यांनी दूर ठेवले आहे. भाजपाच्या हिंदुत्वाला शिवसेनेने चांगला धडा शिकवला आहे.”पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या, प्रबोधन शतक महोत्सव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाप्रसंगी सुशीलकुमार शिंदे हे बोलत होते. सुशीलकुमार म्हणाले, “शिवसेना आज ज्या किमान समान कार्यक्रमनुसार सत्तेत आली, तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते आणि तेच खरे हिंदुत्व आहे. राज्यात शिवसेना २० वर्षानंतर सत्तेत आली असून, खरंतर हेच २५ वर्षे आधी व्हायला हवे होते. त्यामुळे आता पुढे जाऊ या.. ”

सुशीलकुमार शिंदेंचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. ते शिवसेनेच्या कार्यक्रमात येतात. भले भाजपविरोधी बोलतात पण हिंदुत्वावर भाष्य करतात. धर्मनिरपेक्षता, समाजवाद या शब्दांच्या वळचणीलाही ते उभे राहात नाहीत. हाच शिवसेना – भाजपच्या हिंदुत्वाचा प्रभाव आहे. हिंदुत्व भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचे द्योतक आहे. सुशीलकुमारांच्या तोंडी हिंदुत्व येणे हा त्याचा प्रत्यय आहे.

असे आवाहन देखील या कार्यक्रमाच्या माध्यामातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी यावेळी केले. पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा आहे आणि त्या पुण्यात आज प्रबोधनकारांची आणि शिवसेना प्रमुखांची जयंती साजरी होत आहे. ही मोठी ऐतिहासिक घटना असल्याचेही सुशीलकुमार शिंदेंनी बोलून दाखवले.

shushilkumar shinde says, shivsena following true hindutva, kept BJP away from power

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था