विमा कंपन्यांशी सरकारचे साटेलोटे, सात वर्षांची आकडेवारी देत देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मोठा घोटाळा यात आहे. गेल्या तीन वर्षांत १३,५०० कोटींचा फायदा विमा कंपन्यांना होणार आहे असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिकविम्याची आकडेवारी सादर करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता कुठे गेले विमा कंपन्यांच्या कार्यालयावर चालून जाणारे ? असा सवालही त्यांनी केला आहे.Giving statistics of seven years, Devendra Fadnavis attacks Mahavikas Aghadi

फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये सात वर्षांची विम्याची आकडेवारी दिली आहे. २०१४ मध्ये १५९६ कोटी, २०१५ मध्ये ४२०५ कोटी, २०१६-१७ मध्ये १९२४ कोटी,२०१८-१८ मध्ये २७०७ कोटी, २०१८-१९ मध्ये ४६५५ कोटी, २०१९-२० मध्ये ५५११ कोटी आणि २०२०-२१ मध्ये केवळ ८२३ कोटी एवढाच पीकविमा देण्यात आला, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.



शेतकºयांना मदत केंद्राने करावी, कर्जमाफी, चक्रीवादळात मदत, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतील आरक्षण केंद्राने द्यावे, मेट्रोचे काम थांबले केंद्र सरकारने करावे, १०० कोटीची वसुली कारवाई करणार केंद्र सरकार, रेमडेसिव्हीर पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दोषी, आॅक्सिजन, ब्लॅक फंगससाठी केंद्र सरकार दोषी, लसीकरण केंद्र सरकारने करावे असे जर सर्व केंद्र सरकार करत असेल तर तुम्हाला वडे तळायला बसवलंय का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांनी पीकविम्याची सादर केलेली आकडेवारी :

  • 2014 : 1596 कोटी
  • 2015 : 4205 कोटी
  • 2016-17 : 1924 कोटी
  • 2017-18 : 2707 कोटी
  • 2018-19 : 4655 कोटी
  • 2019-20 : 5511 कोटी
  • 2020-21 : 823 कोटी

शिवसेनेने २०१९ च्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे न देणाऱ्या विमा कंपन्यांवर मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळत नाही म्हणून शिवसेनेचे खासदार पंतप्रधानांना भेटतील.

त्याउपरही विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर शिवसेना पुन्हा आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात पूर संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. हा पूर आणि दुष्काळ सरकारला दिसतो. मग विमा कंपन्यांना का दिसत नाही? शेतकऱ्यांनी एकरी 1800 रुपये विम्याचा हफ्ता भरला तरी त्यांना एकरी फक्त 102 रुपये मिळतात.

केंद्र सरकारच्या योजनेत 53 लाख शेतकºयांना पात्र, 90 लाख शेतकºयांना अपात्र ठरविले. या 90 लाख शेतकऱ्यांना अपात्र कोणी ठरविले? त्यासाठी काय निकष ते तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावेळी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. हाच संदर्भ देत फडणवीस यांनी गेल्या सात वर्षांतील आकडेवारी सादर केली आहे.

चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना राज्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ मध्ये केवळ ८२३ कोटी रुपये विमा मिळाला होता. सत्तेवर नसताना विम्यासाठी विमा कंपन्यांवर चालून जाणारे आता कोठे गेले? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

Giving statistics of seven years, Devendra Fadnavis attacks Mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात