असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटी नव्हे, तर १९.५ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : एका महिला सरपंचाची तब्बल ११ कोटी नव्हे, तर १९.५ कोटींची संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. छापा टाकण्यासाठी आलेले लोकायुक्त आणि कर्मचारीही अफाट संपत्ती पाहून आश्चर्यचकित झाले.Women sarpanchRs has 11 crore rupees assets , one acre bungalow with swimming pool

मध्यप्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील हुजूर तालुक्याच्या बैजनाथ या गावातील महिला सरपंचावर कारवाई करत लोकायुक्तांनी त्यांची 11 कोटींपेक्षा जास्त संपत्ती उघड केली आहे.गावच्या महिला सरपंच सुधा सिंग यांच्याकडे एक आलिशान बंगला, कोट्यवधी किंमतीची वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, जमीन, विम्यासह क्रेशर, जेसीबी, चेन माऊंटन यांसारह्यया मशीन सापडल्या आहेत.



त्यांची अंदाजित किंमत 11 कोटींपेक्षा जास्त आहे.सुधा सिंग यांनी त्यांच्या एक एकर बंगल्यात एक जलतरण तलावही बांधला होता. लोकायुक्त सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. आतापर्यंत 24 पेक्षा अधिक जमिनींची रजिस्ट्री, अनेक वाहने, आलिशान बंगले, क्रेझर्स, सोने, चांदी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यावर लोकायुक्तांनी न्यायालयाकडून सर्च वॉरंट घेतले होते. यामध्ये आतापर्यंत कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली आहे. अद्याप कारवाई सुरू आहे आणि मालमत्ता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Women sarpanchRs has 11 crore rupees assets , one acre bungalow with swimming pool

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात