राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्यांवर होणार कारवाई, पालकमंत्र्यांसमोरच घेतली जाणार हजेरी


विशेष प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांनी भाजप नेत्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याचे प्रकरण भोवणार आहे. पक्षाने सांगूनही सुध्दा प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे शहराध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर या सदस्यांना उभे करण्यात येणार आहे. Action will be taken against NCP standing committee members, attendance will be taken before the Guardian Minister

प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडुन याबाबतचा खुलासा करण्यात आला. स्थायी समिती सुरु असताना भाजपच्या सदस्यांनी गोंधळ केला आणि यामध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचा खुलासा नंदा लोणकर यांनी केला. मात्र वारंवार असे प्रकार होत असल्यामुळे शहराध्यक्ष जगताप यांनी सदस्यांना चांगलेच सुनावले.पक्षाच्या भुमिकेविरोधात निविदांना पाठींबा देणार्‍यांची गय केली जाणार नाही. समाविष्ट गावांतील ड्रेनेज लाईन तसेच सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोध करण्याचा निर्णय मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. परंतू मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हे दोन्ही प्रस्ताव एकमताने मंजूर झाले आहेत.

याप्रकरणी बैठकीला उपस्थित पक्षाच्या तीनही सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना जगताप यांनी उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्या आणि मी स्वत: निरोप दिल्यानंतरही पक्षाच्या विरोधात भुमिका घेणे हे पक्षशिस्तीच्या विरोधात आहे.

सत्ताधा-यानी अन्य एका विषयावरून झालेल्या गोंधळाचा लाभ घेत ड्रेनेज लाईन व सुरक्षा रक्षकाचा विषय झटपट पुकारून मान्यही करून घेतला, असा प्राथमिक खुलासा तीन सदस्यांनी दिला आहे. परंतू सभेचे रेकॉर्डींगही आम्ही घेतले असून पवार यांच्या उपस्थितीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदेचा फेरविचार देण्यात आला असून ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देणे, समाविष्ट गावातील ड्रेनेज लाईन, सुरक्षा रक्षक नियुक्ती, ई व्हेईकल्स, सदनिकांची विक्री या प्रस्तावांबाबत राज्य शासनाकडे तसेच अन्य तपासयंत्रणांकडेही तक्रार देणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Action will be taken against NCP standing committee members, attendance will be taken before the Guardian Minister

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण