अनोखी शस्त्रक्रिया : रुग्णाला भूल न देताच केले ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, महिला रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान म्हणत राहिली हनुमान चालिसा! Watch Video

woman kept speaking hanuman chalisa on operation table delhi aiims doctors did successful brain surgery by awake craniotomy

delhi aiims : राजधानी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या न्यूरो सर्जरी विभागात एका महिला रुग्णाला भूल न देता ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असताना महिलेने हनुमान चालिसाचा पाठ सुरू ठेवला होता. या अनोख्या ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावर कौतुक होत आहे. woman kept speaking hanuman chalisa on operation table delhi aiims doctors did successful brain surgery by awake craniotomy


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या न्यूरो सर्जरी विभागात एका महिला रुग्णाला भूल न देता ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरू असताना महिलेने हनुमान चालिसाचा पाठ सुरू ठेवला होता. या अनोख्या ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

मेंदूवर होणारी शस्त्रक्रिया ही रुग्ण आणि डॉक्टर या दोन्हींसाठी सर्वात क्लिष्ट मानली जाते. अशा कोणत्याही शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांनी बरीच दक्षता घ्यावी लागते, जेणेकरून रुग्णाला कोणतीही समस्या उद्भवू नये. दिल्ली एम्सच्या न्यूरो अनेस्थेटिक टीमने रुग्णाला भूल देण्याशिवाय ब्रेन ट्यूमरची केलेली शस्त्रक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान महिला रुग्ण पूर्णपणे शुद्धीत तर होतीच शिवाय तिने ऑपरेशन टेबलवर हनुमान चालिसाचे पठणही केले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी एम्स येथे दोन वेक क्रेनोटॉमी करण्यात आल्या. त्यातील एक 24 वर्षीय तरुण शालेय शिक्षिका होती, जिच्या मेंदूत डाव्या बाजूला ब्रेन ट्यूमर (ग्लिओमा) होता. डॉक्टर तिची गाठ काढत असतानाच ती हनुमान चालिसाचा पाठ करत राहिली. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या एका सदस्याने त्याचा व्हिडिओ बनविला.

शस्त्रक्रियेनंतर तिने आपले केस शॅम्पू केले आणि शस्त्रक्रियेची कोणतीही भीती न बाळगता हसत हसत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडली.

अनेस्थेसियाची योग्य काळजी आणि सहायक उपकरणांमुळे डॉक्टरांचे काम थोडे सोपे झाले आहे. जागृत क्रेनियोटॉमी (संपूर्ण भूल न देता करण्यात येणारी शस्त्रक्रिया) 2002 पासून न्यूरो शस्त्रक्रिया विभागामार्फत केली जात आहे. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांच्या कम्फर्टवरही बरेच काही अवलंबून असते.

woman kept speaking hanuman chalisa on operation table delhi aiims doctors did successful brain surgery by awake craniotomy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात