Pegasus Effect; की अजब तर्कट??; सरकारी कर्मचाऱ्यांवर मोबाईल कमी वापरण्याचे ठाकरे – पवार सरकारचे बंधन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यासच मोबाईल फोनचा वापर करावा असे सांगण्यात आले आहे. अतिरिक्त मोबाईल वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे अजब तर्कट सरकारने लढविले आहे. Thackeray – pawar govt applies break on mobile use of govt servents to save its collapsing image

देशात पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे – पवार सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करून लँडलाईन फोन वापरासाठी अधिक सोयीस्कर असल्याचे सांगितले आहे. सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या आदेशात राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असे सांगितले आहे.



कार्यालयीन वेळात मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले आहे. जर मोबाईल फोन वापरायचे असतील तर टेक्स्ट मेसेजचा अधिक वापर करावा आणि या उपकरणांद्वारे केलेली संभाषणे कमी केली जावीत. कार्यालयीन वेळेत मोबाईलद्वारे सोशल मीडियाचा वापर मर्यादित असावा, असे सरकारने म्हटले आहे.

– सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भ्रमणध्वनी वापराचे शिष्टाचार या नावाखली हे आदेश काढले आहेत.

  • कर्मचाऱ्यांकरिता मोबाईलच्या वापराचे शिष्टाचार ठरवून देण्याची वेळ पहिल्यांदाच राज्य सरकारवर आली आहे. परंतु, यातही भ्रमणध्वनीच्या अंगभूत वैशिट्यांमुळे तो नेमका ‘धरायचा’ कुठे आणि ‘सोडायचा’ कुठे हे ठरविताना सरकारी यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
  • सध्या गाजत असलेल्या पेगॅसस प्रकरणाच्या पार्श्वाभूमीवर राज्याने हे शिष्टाचा आणले आहे हे विशेष. त्यात कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीऐवजी प्राधान्याने कार्यालयीन दूरध्वनीचा (लॅण्डलाईन) वापर करावा, कार्यालयीन वेळेत गरज असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा, असा आग्रह सामान्य प्रशासन विभागाने धरला आहे. अर्थात कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये, अशी विरोधाभास दाखवणारी सूचनाही आहे.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात-बैठकीदरम्यान मोबाईलवरील कॉल, संदेश तपासणे, इअर फोन वापरणे या बाबी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच वरिष्ठांच्या कक्षात मोबाईल सायलेंट वा व्हायब्रेट मोडवर ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

Thackeray – pawar govt applies break on mobile use of govt servents to save its collapsing image

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात