भारतातील कर्मचाऱ्यांचा पगार पुढील वर्षी चांगला वाढणार, पाहा कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढणार मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांत मंदी आली होती. लोकांचे पगारही कमी झाले होते. मात्र, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील आर्थिक वर्षात भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
एप्रिल २०२२ पासून किमान आठ टक्यांनी पगार वाढण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. यापूर्वी पगारात ६ ते ८ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या परिणामांपासून बाहेर पडण्याचा आशादायी अंदाज कंपन्यांकडून व्यक्त केला जात आहे. The salaries of employees in India will increase well next year, see in which sector the demand for employees will increase

आजपर्यंतचा इतिहास आहे की अशियातील सर्वाधिक आर्थिक वाढ भारतामध्येच होते. पुढील दोन वर्षांपर्यंत ही वाढ कायम राहणार आहे. गेल्या दशकात महामाई वाढली, त्याचबरोबर ग्राहक निर्देशांकातही वाढ झाली. त्यामुळे मागणी कमी झाली होती. मात्र, आता मागणी वाढू लागली आहे.

प्रामुख्याने संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतामध्ये सुमारे २० टक्के कर्मचारी हे संघटित क्षेत्रात काम करतात. या क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांची गरज वाढत जाणार आहे. याचे कारण म्हणजे कुशल कर्मचाऱ्यांची संख्या सध्या कमी होत आहे, असे मुख्य वाणिज्य अधिकारी रुपंक चौधरी यांनी सांगितले.

भारतामध्ये कुशल कर्मचाऱ्यांची नेहमीच वानवा राहिली आहे. त्यामुळे पगारवाढीसाठी केवळ एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ किंवा महागाई हे कारण नाही. तर कुशल कर्मचारी मिळत नसल्याने पगार वाढणार आहेत. ई- कॉमर्स, फार्मास्युटिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आर्थिक सेवा या क्षेत्रातील कर्मचाºयांच्या वेतनात मोठी वृध्दी होणार आहे.

The salaries of employees in India will increase well next year, see in which sector the demand for employees will increase

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात