हवाई प्रवासाच्या भाड्यात वाढ, खासगी जेट विमानांनीही मागणी वाढली


भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने श्रीमंतांकडून परदेशात जाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यातच संयुक्त अरब आमिरातीची (यूएई) भारतासोबतची विमानसेवा रविवारपासून १० दिवसांसाठी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर हवाई प्रवास भाड्यात मोठी वाढ झाली, तसेच खासगी जेट विमानांची मागणीही वाढली आहे.With the increase in air fares, the demand for private jets also increased


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने श्रीमंतांकडून परदेशात जाण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यातच संयुक्त अरब आमिरातीची (यूएई) भारतासोबतची विमानसेवा रविवारपासून १० दिवसांसाठी बंद राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर हवाई प्रवास भाड्यात मोठी वाढ झाली, तसेच खासगी जेट विमानांची मागणीही वाढली आहे.यूएईची विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर शुक्रवारपासून श्रीमंत भारतीयांनी देशाबाहेर जाण्याची घाई सुरू केली.



मुंबई ते दुबई अशा एकमार्गी व्यावसायिक विमानांचे शुक्रवार आणि शनिवारी या दोन दिवसांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले. त्यामुळे प्रवास भाडे सामान्य काळातील भाड्याच्या तुलनेत १० पट वाढून ८० हजार रुपये (१ हजार डॉलर) झाले. याशिवाय नवी दिल्ली ते दुबई या मार्गावरील तिकिटाचे दर ५ पट वाढून ५० हजार रुपये झाले.

एअर चार्टर सर्व्हिस इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, शुक्रवार-शनिवार या दोन दिवसांसाठी खासगी जेट विमानांची मागणी प्रचंड वाढली. शनिवारी आमची १२ विमाने दुबईला गेली. ही सर्व विमाने पूर्ण क्षमतेने भरलेली होती.

आज एकाच दिवसात विमानांची चौकशी करणारे ८० कॉल मी नोंदवले. मुंबई ते दुबई या मार्गावरील १३ आसनी विमानाचे भाडे ३८ हजार डॉलर; तर सहा आसनी विमानाचे भाडे ३१ हजार डॉलर आहे. विमानात जागा मिळावी,

यासाठी लोक समूह करून आमची जेट विमाने बुक करीत आहेत. आम्हाला थायलंडसाठीही काही विचारणा झाल्या; पण बहुतांश मागणी दुबईसाठीच होती. यूएई आणि भारत यांच्यात दर आठवड्याला ३०० व्यावसायिक विमान उड्डाणे होतात. यूएईमध्ये ३.३ दशलक्ष भारतीय राहतात. यातील बहुतांश लोक दुबईत राहतात

With the increase in air fares, the demand for private jets also increased

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात