फ्रान्समधून भारतात आणखी 3 लढाऊ राफेल दाखल, हवाई दलाची वाढली ताकद

Three more Rafale aircrafts Landed in India From France Latest Updates

फ्रान्समधील राफेल लढाऊ विमानांची तिसरी खेपही बुधवारी भारतात दाखल झाली आहे. 3 राफेल विमाने काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाच्या तळावर आली. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली. हवाई दलाने सांगितले की, 3 राफेल विमानांची तिसरी तुकडी काही काळापूर्वी आयएएफ तळावर आली. तिन्ही लढाऊ विमानांनी नॉनस्टॉप 7000 किलोमीटरहून अधिक उड्डाण केले. Three more Rafale aircrafts Landed in India From France Latest Updates


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : फ्रान्समधील राफेल लढाऊ विमानांची तिसरी खेपही बुधवारी भारतात दाखल झाली आहे. 3 राफेल विमाने काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाच्या तळावर आली. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली. हवाई दलाने सांगितले की, 3 राफेल विमानांची तिसरी तुकडी काही काळापूर्वी आयएएफ तळावर आली. तिन्ही लढाऊ विमानांनी नॉनस्टॉप 7000 किलोमीटरहून अधिक उड्डाण केले. वाटेत हवेतच त्यांनी युएई हवाई दलाच्या मदतीने इंधन भरले, यासाठी भारतीय वायुसेनेने त्यांचे कौतुक केले आहे.भारतीय हवाई दलाने सप्टेंबर 2016 मध्ये 36 लढाऊ राफेल विमानांसाठी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांच्या करार केला होता. भारतातील राफेल विमानांची संख्या आता 11 झाली आहे. यापूर्वी तीन राफेल विमानांची दुसरी खेप गतवर्षी नोव्हेंबरमध्ये जामनगरात दाखल झाली होती.

Three more Rafale aircrafts Landed in India From France Latest Updates

दरम्यान, गतवर्षी 29 जुलै रोजी पाच राफेल विमानांची पहिली खेप भारतात पोहोचली होती. भारत आणि फ्रान्सने 36 विमानांसाठी 59 हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर चार वर्षांनी पहिली खेप पाठवली. गतवर्षी 3 नोव्हेंबरला तीन राफेल विमानांची दुसरी खेप भारतात आली. राफेल विमाने ही फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनविलेली आहेत. तेवीस वर्षांपूर्वी रशियातून सुखोई विमानांचे अधिग्रहण केल्यानंतर, हा दुसरा मोठा विमान करार अमलात आला आहे.

Three more Rafale aircrafts Landed in India From France Latest Updates

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती