भाजपकडे दलित, मागासवर्गीय मतदार का आकर्षित होत आहेत? अमर्त्य सेन यांनी सांगितले कारण

Why Dalit and backward voters attracted to BJP? Amartya Sen said the reason

Amartya Sen : देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीत अशा 4 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. 2 मे रोजी या निवडणुकांचे निकाल होती येणार आहेत. यादरम्यान सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते पश्चिम बंगालच्या निवडणुकीने. येथे आतापर्यंत निवडणुकीतील चार टप्पे पार पडले असून अजूनही चार टप्प्यांतील मतदान शिल्लक आहे. प. बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलला भाजपकडून कडवे आव्हान मिळताना दिसत आहे. येथे दलित आणि मागासवर्गीय मतदारांचा ओढा भाजपकडे असल्याचे मत अनेक सर्व्हे आणि राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे. हिंदुत्ववादी पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दलित मतदार कसा वळला आहे, याचे कोडे भल्याभल्यांना पडले आहे. याचसंबंधी हिंदुस्थान टाइम्सच्या ऑन द रेकॉर्ड या शोमध्ये अँकर सुनेत्रा चौधरी यांनी नोबेल प्राप्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना बोलते केले आहे. Why Dalit and backward voters attracted to BJP? Amartya Sen said the reason


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीत अशा 4 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. 2 मे रोजी या निवडणुकांचे निकाल होती येणार आहेत. यादरम्यान सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते पश्चिम बंगालच्या (west bengal Assembly Elections 2021) निवडणुकीने. येथे आतापर्यंत निवडणुकीतील चार टप्पे पार पडले असून अजूनही चार टप्प्यांतील मतदान शिल्लक आहे. प. बंगालमध्ये ममतांच्या तृणमूलला भाजपकडून कडवे आव्हान मिळताना दिसत आहे. येथे दलित आणि मागासवर्गीय मतदारांचा ओढा भाजपकडे असल्याचे मत अनेक सर्व्हे आणि राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे. हिंदुत्ववादी पक्षाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दलित मतदार कसा वळला आहे, याचे कोडे भल्याभल्यांना पडले आहे. याचसंबंधी हिंदुस्थान टाइम्सच्या ऑन द रेकॉर्ड या शोमध्ये अँकर सुनेत्रा चौधरी यांनी नोबेल प्राप्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना बोलते केले आहे.

सुनेत्रा चौधरी यांनी अमर्त्य सेन यांना थेट सवाल केला की, भाजपकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दलित आणि मागासवर्गीय मतदार आकर्षित होण्याचे नेमके कारण काय आहे? यावर अमर्त्य सेन यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले आहे.

अमर्त्य सेन म्हणाले की, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला संघटनेच्या कामांकडेही लक्ष द्यावे लागेल. आता केरळचेच उदाहरण घ्या ना! केरळमध्ये ऐककाळी भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त अस्पृश्यता होती, जातीभेद होता. परंतु कम्युनिस्ट राजवटीनंतर तेथे मोठ्या प्रमाणात बदल झाला. अस्पृश्यता, जातिप्रथा या गोष्टी कालबाह्य ठरल्या. यासाठी त्यांच्या संघटनात्मक कामांना श्रेय जाईल. याच प्रकारे भाजपने प. बंगालमध्ये केलेली संघटनात्मक कामे, तळागाळात जोडलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांची उभारलेली फळी आणि इतरही वैशिष्ट्यपूर्ण कामे आहेत.

त्रिपुराचं उदाहरण पाहा. मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असलेल्या या राज्यात कम्युनिस्टांची सत्ता होती. परंतु त्यांना तेथे संघटनेची शक्ती टिकवून ठेवता आली नाही, उलट भाजपने मात्र आपल्या संघटनात्मक कामांद्वारे जनतेशी नाळ जोडली आणि तेथे आज या पक्षाची सत्ता आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला देशपातळीवर यापूर्वी कधीही एवढे महत्त्व नव्हते. परंतु आता देशाच्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री दर दोन दिवसांनी राज्यात येतात. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह स्वत: लक्ष घालतात. तुम्ही फक्त बंगालकडे पाहून नका, भाजपने जिंकलेल्या इतर निवडणुकांकडेही पाहा, तुम्हाला यामागे त्यांचे मोठे काम दिसून येईल.

तुम्ही म्हणाल की, बंगाल तर धर्मनिरपेक्ष आहे मग येथे हिंदुत्ववादी पक्ष कसा काय निवडून येण्याची शक्यता आहे, तर मी म्हणेन की, याकडे असे पाहून चालणार नही. कारण येथे दोन्ही पक्षांच्या संदेशांकडे, कामांकडे पाहावे लागेल. तुम्ही लोकांना काय देण्याचे आश्वासन देता, तुमची लोकांपर्यंत जाण्याची भाषा कशी आहे, यावरही बरंच काही आहे.

Why Dalit and backward voters attracted to BJP? Amartya Sen said the reason

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात