कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा मोठा धोका ; तज्ज्ञाचा इशारा


वृत्तसंस्था

लंडन : कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा धोका अधिक आहे. कोरोना लसीच्या तुलनेत हा धोका १० पट अधिक आहे. तसेच आधारभूत रेषेच्या तुलनेत तो १०० पट अधिक आहे, असा इशारा तज्ज्ञानी दिला. High risk of lumps in the patient’s blood after corona infection; Expert warning

कोविड- १९ चा संसर्ग झाल्यानंतर ‘सेरेब्रल व्हेनस थ्राँबॉयसिस’ (सीव्हीटी) नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्ताच्या गाठी होण्याचा धोका लसीकरणानंतरच्या धोक्यापेक्षा मोठा असतो, असे अभ्यासात आढळले आहे. त्याचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर केले आहेत.



ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभ्यासात, कोविड-१९ चे निदान झाल्यानंतर, किंवा लशीची पहिली मात्रा दिल्यानंतरच्या दोन आठवड्यांत निदान झालेल्या सीव्हीटीच्या प्रकरणांची संख्या मोजली. त्यांनी याची तुलना शीतज्वरानंतरच्या (इन्फ्ल्युएंझा) गणना झालेल्या सीव्हीटीच्या घटनांशी केली. इतर कुठल्याही तुलनात्मक गटापेक्षा कोविड-१९ नंतर सीव्हीटीचे प्रमाण अधिक होते. यापैकी ३० टक्के प्रकरणे ३० वर्षांहून कमी वयोगटात आढळली.

लशी आणि सीव्हीटी यांच्यातील संभाव्य संबंधाबाबत काही काळजीच्या बाबी आहेत. त्यामुळे काही लशींच्या वापरावर निर्बंध आणणे भाग पडत आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील ट्रान्सलेशनल न्यूरोबायोलॉजी गटाचे प्रमुख पॉल हॅरिसन यांनी सांगितले.

High risk of lumps in the patient’s blood after corona infection; Expert warning

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात