Ranjit Sinha Death : सीबीआयचे माजी प्रमुख रणजित सिन्हा यांचे दिल्लीत निधन

Ranjit Sinha death: Former CBI chief Ranjit Sinha has died in Delhi

केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (CBI) माजी संचालक रणजित सिन्हा (Ranjit Sinha Death) यांचे दिल्लीत निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, त्यांनी शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. आपल्या कारकीर्दीत सिन्हा यांनी सीबीआय संचालक, आयटीबीपी डीजी यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. रणजित सिन्हा हे 1974च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) चे संचालक होते. Ranjit Sinha death: Former CBI chief Ranjit Sinha has died in Delhi


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (CBI) माजी संचालक रणजित सिन्हा (Ranjit Sinha Death) यांचे दिल्लीत निधन झाले. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, त्यांनी शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. आपल्या कारकीर्दीत सिन्हा यांनी सीबीआय संचालक, आयटीबीपी डीजी यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. रणजित सिन्हा हे 1974च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) चे संचालक होते.

रणजित सिन्हा यांच्यावरही भ्रष्टाचाराचेही आरोप लागले होता. सीबीआयनेही त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. रणजित सिन्हा यांच्यावर सीबीआयचे प्रमुखपद सांभाळताना कोळसा वाटप घोटाळ्याच्या तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.

22 नोव्हेंबर 2012 रोजी, त्यांना दोन वर्षांसाठी सीबीआयचे प्रमुख करण्यात आले. यापूर्वी त्यांनी रेल्वे संरक्षण दलाचे प्रमुख आणि पाटणा व दिल्ली सीबीआयमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले होते.

Ranjit Sinha death: Former CBI chief Ranjit Sinha has died in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण