केंद्राच्या उपाययोजनांची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, म्हणाले- केंद्राची रणनीती म्हणजे लॉकडाऊन लगाओ, घंटी बजाओ!

Rahul Gandhi Tweet Criticized Central Govt on Corona strategy

Rahul Gandhi Tweet : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटने देशाला विळखा घातला आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी देशात कोरोनाचे 2 लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. मागच्या 37 दिवसांपासून सातत्याने विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. यामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या रणनीतीवर केंद्र सरकारने कडक उपाययोजना केल्या आहेत. लसीकरणात वाढ, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आयातीची तरतूद, रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी याबरोबरच सातत्याने राज्यांशी संपर्कात राहून त्यांना हवी ती मदत देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. दरम्यान, केंद्राच्या या प्रयत्नांकडे कानाडोळा करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मात्र खिल्ली उडवली आहे. Rahul Gandhi Tweet Criticized Central Govt on Corona strategy


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटने देशाला विळखा घातला आहे. आज सलग दुसर्‍या दिवशी देशात कोरोनाचे 2 लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. मागच्या 37 दिवसांपासून सातत्याने विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. यामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या रणनीतीवर केंद्र सरकारने कडक उपाययोजना केल्या आहेत. लसीकरणात वाढ, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आयातीची तरतूद, रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी याबरोबरच सातत्याने राज्यांशी संपर्कात राहून त्यांना हवी ती मदत देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. दरम्यान, केंद्राच्या या प्रयत्नांकडे कानाडोळा करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मात्र खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्वीट करून केंद्र सरकारच्या कोरोना रणनीतीवर टीका केली. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या तीन रणनीती आहेत. पहिली- तुघलकी लॉकडाऊन लगाओ. दुसरी- घंटी बजाओ आणि तिसरी- प्रभु के गुण गाओ. तथापि, केंद्रावर टीका करण्याची राहुल गांधींची ही पहिलीच वेळ नाही. कोरोनाविरुद्ध लढाईत केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर पहिल्यापासूनच राहुल गांधींनी आक्रमक होत टीका केली आहे.

तत्पूर्वी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीबाबत सरकारवर निशाणा साधला आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या अभावाखाली लस उत्सव साजरा करणे म्हणजे फसवणूक असल्याचे म्हटले. त्यांनी ट्विट केले होते की, ‘कसलीही चाचणी नाही, रुग्णालयात बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही…, लसदेखील नाही, फक्त उत्सवाचा दिखावा आहे. पीएम केअर्स?’

दरम्यान, गुरुवारी रात्रीपर्यंत देशात कोरोनाचे 2,17,850 नवीन रुग्ण नोंदवले गेल, या काळात 1183 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात आढळलेली ही कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता पहिल्या लाटेला मागे टाकले आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 14287740 वर गेली आहे. कोरोनामुळे पीडित लोकांच्या बरे होण्याचा दर खाली घसरून 89.51 टक्के झाला आहे.

Rahul Gandhi Tweet Criticized Central Govt on Corona strategy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात