विरोधकांच्या ऐक्यासाठी बैठका सुरू असताना भाजपच्या तीन बड्या नेत्यांचे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून”मिशन साऊथ”!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरातल्या विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रमुख विरोधी नेत्यांच्या बैठका सुरू असताना भाजपच्या तीन बड्या नेत्यांच्या मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर रोड शो, रॅली आणि जाहीर सभा सुरू होऊन भाजपचे “मिशन साऊथ” सुरू झाले आहे. While opposition holding only meetings for opposition unity 3 biggest of BJP are on the mission south for BJP

आज एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी विरोधी ऐक्याबाबत बैठका झाल्या असताना तिकडे दक्षिणेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे रोड शो आणि जाहीर सभांद्वारे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची मध्ये केरळच्या पारंपारिक पोशाखात मोठा रोड शो केला. त्यासाठी ते त्यांच्या कारमधून उतरून प्रत्यक्ष रस्त्यावर चालले आणि लोकांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर त्यांनी थेवर मध्ये युवक संमेलनाला संबोधित केले.

कर्नाटक विधान विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या अनुक्रमे मैसूर आणि गुंडलपेठ मध्ये रोड शो आणि चिकबल्लारपूर मध्ये रोड शो आणि जाहीर सभा झाल्या. अमित शाह यांनी म्हैसूर मध्ये माता चामुंडेश्वरीचे दर्शन घेतले. अमित शाह हे कालपासून तेलंगण आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. तेलंगणामध्ये त्यांनी दोन जाहीर सभांना संबोधित केले, तर कर्नाटकात रोड शो केले.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आजपासून कर्नाटक दौऱ्यावर आहेत आणि त्यांचे रोड शो सुरू झाले आहेत. भाजपने राष्ट्रीय नेत्यांची आणि प्रादेशिक नेत्यांची संपूर्ण फौज कर्नाटकच्या प्रचारात उतरवली आहे. त्यांचा प्रचार प्रत्यक्ष रस्त्यावर रस्त्यावर सुरू झाला आहे.

काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी देखील उत्तर कर्नाटकच्या दौरा केला आहे. त्यांच्या जाहीर सभा आणि रोड शो झाले आहेत.

पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकवण्यासाठी धडपड करत असलेल्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्यासाठी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवत असली तरी अद्याप तिथल्या प्रचारात उतरलेले दिसत नाहीत. त्यांची आणि प्रकाश आंबेडकरांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे.

144 मतदारसंघांवर कॉन्सन्ट्रेशन

नितीश कुमार, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची एकीकडे बैठका झाल्या असताना भाजपचे तीन बडे नेते मात्र “मिशन साऊथ” वर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. दक्षिण आणि पूर्व भारतातील 144 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष कॉन्सन्ट्रेशन केले आहे. त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आव्हान भाजप पुढे आहे आणि ते पेलण्यासाठी भाजपचे तीन बडे नेते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. यापुढेही त्यांचे दौरे पूर्व आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये वाढणार आहेत.

While opposition holding only meetings for opposition unity 3 biggest of BJP are on the mission south for BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात