आम्ही प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांचा आदर करतो, गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांचे प्रतिपादन


देशात ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशातील कायदे मानायचे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे. मात्र, जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचई यांनी म्हटले आहे की आम्ही जेथे काम करतो अशा प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो. सरकारांनी केलेल्या विनंतीची आम्ही अंमलबजावणी करतो त्यावेळी ते आम्ही आमच्या पारदर्शकता अहवालात नमूद करतो.We respect local laws in every country, asserts Google CEO Sundar Pichai


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशातील कायदे मानायचे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे.

मात्र, जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचई यांनी म्हटले आहे की आम्ही जेथे काम करतो अशा प्रत्येक देशातील स्थानिक कायद्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो.



सरकारांनी केलेल्या विनंतीची आम्ही अंमलबजावणी करतो त्यावेळी ते आम्ही आमच्या पारदर्शकता अहवालात नमूद करतो.अशिया प्रशांत क्षेत्रातील निवडक पत्रकारांसोबत साधलेल्या आभासी संवादात पिचाई म्हणाले,

आम्ही विधायकपणे व पारदर्शकतेने काम करतो. मुक्त व खुले इंटरनेट हे पायाभूत असून भारताला त्याची मोठी परंपरा आहे. एक कंपनी म्हणून मुक्त व खुल्या इंटरनेटबद्दलची मूल्ये व त्यामुळे होणारे फायदे याबाबत आमची मते स्पष्ट असून आम्ही त्यांचा पुरस्कार करतो;

तसेच जगभरातील नियामकांसोबत आम्ही विधायक सहकार्य करतो व त्याबाबतच्या प्रक्रियांमध्ये सहभागी होतो.वैधानिक प्रक्रियांचा आमची कंपनी आदर करते

आणि ज्या ठिकाणी त्याला पाठिंबा देण्याची गरज असते, तेथे तसेही करते. याबाबत आम्ही जगभरात संतुलन साधले आहे, असेही पिचई यांनी सांगितले.

We respect local laws in every country, asserts Google CEO Sundar Pichai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात