कोरोना विषाणूच्या मुळावरुन खवळलेल्या चीनने उगाळला अमेरिकेचा ‘काळा इतिहास’


चीनमधल्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोविड-19 विषाणू जगभर पसरला. चीन जैविक शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडला, अशी चर्चा गेल्या दीड वर्षांपासून जगभर आहे. चीनमुळेच जगावर अभूतपूर्व असे कोरोना महामारीचे संकट ओढवले. त्यामुळे कोविड-19 च्या उद्रेकाचा उगम शोधलाच पाहिजे, असे जगातील अनेक देशांना वाटते. अमेरिकेच्या अध्यक्षांनी या संदर्भात थेट आदेशच दिल्याने चीन खवळला आहे. China Agitated because of Covid-19’s origin, unravels US ‘black history as US President Joe Biden ordered a probe into the Covid-19 origins


वृत्तसंस्था

बीजींग :  “अमेरिकेच्या गुप्तचरांचा काळा इतिहास जगाला फार पूर्वीपासून माहिती आहे,” या शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी अमेरिकेवर तोफ डागली आहे. इराकमध्ये केलेल्या कारवाईकडे चीनी परराष्ट्र मंत्रालयाचा रोख होता.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी कोविड-19 या विषाणूचा उद्रेक कसा, कुठून झाला याच्या चौकशीचे आदेश गुरुवारी दिले. वुहानमधील प्रयोगशाळेतून हा विषाणू “लीक” झाला का,



चीन आणि अमेरिकेतील या विषाणूचे स्ट्रेन यांच्यात काही संबंध आहे का, याचा चौकशी अहवाल देण्याचा आदेश बायडेन यांनी दिला आहे. कोविड-19 चा उद्रेक पहिल्यांदा चीनमधून झाला

की त्याचा संसर्ग एखाद्या प्राण्यातून झाला यासंबंधीचा अहवाल येत्या तीन महिन्यात देण्याची सूचना बायडेन यांनी त्यांच्या गुप्तचरांना केली आहे. यामुळे चीन संतापला आहे.

वुहानमधल्या प्रयोगशाळेतून कोविड-19 विषाणू अपघाताने बाहेर पडल्याचा तर्क जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) लांबलेल्या चीन मोहिमेनंतर पहिल्या टप्प्यात नाकारला गेला. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा हीच चर्चा ऐरणीवर आली आहे.

यामागे वॉशिंग्टनची भूमिका असल्याचे सांगितले जाते. चीनने ‘वुहान लॅब लीक थिअरी’ पूर्णतः फेटाळून लावली आहे. उलट “अमेरिका साथीच्या रोगाचे राजकारण करत असून अकारण संभ्रम पसरवत आहे.

अमेरिकेतील वाढत्या कोरोना मृत्यूंवरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असे आरोप चीनने अमेरिकेवरच केले आहेत.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजैन यांनी कोरोना विषाणूच्या उगमाचा तपास करण्याची गरज फेटाळून लावली.

बायडेन प्रशासनाचा उद्देश आणि हेतू स्पष्ट असल्याची टीप्पणी त्यांनी केली. “अमेरिकी गुप्तचरांचा काळा इतिहास जग चांगलेच ओळखून आहे,” असे म्हणच लीजैन यांनी इराकमधील अमेरिकेच्या कारवाईकडे अंगुलीनिर्देश केला.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना विषाणूच्या उगमासंबंधीच्या दोन शक्यतांवर अमेरिकी गुप्तहेर यंत्रणा सध्या काम करत आहेत. आजवर कोरोनामुळे जगभरातल्या सुमारे 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. बायडेन यांनी दिलेल्या आदेशामुळे कोरोना विषाणूच्या उगमाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

चीनमधल्या वुहान येथील जनावरांच्या बाजारातून कोरोना विषाणू बाहेर पहिल्यांदा पडला असा एक मतप्रवाह आहे. तर याच वुहानमधल्या चीनी प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू पहिल्यांदा बाहेर पडला असा दुसरा मतप्रवाह आहे.

अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकी गुप्तहेरांच्या अहवालाचा दाखला देत नुकतेच लिहिले की, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे काम करणारे तीन संशोधक नोव्हेंबर 2019 मध्ये गंभीर आजारी पडले. त्यानंतर महिन्याने बीजींगने एका गुढ न्युमोनियाचा उद्रेक झाल्याचे जाहीर केले होते.

कोरोना विषाणूचा उगम नैसर्गिक आहे – हे गृहीतक चीनला भेट दिलेल्या डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ समितीने स्विकारले. वटवाघळांमधून कोरोना विषाणूचा संसर्ग माणसांना झाला असे त्यांनी सांगितले.

डब्ल्यूएचओच्या या दाव्यावर कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात जगातल्या अनेक देशांनी विश्वास ठेवला. पण त्यानंतर सार्स-सीओव्ही-2 शी जनुकीय साधर्म्य असणारा हा कोरोना विषाणू वटवाघूळ किंवा अन्य प्राण्यांमध्ये शास्त्रज्ञांना आढळलाच नाही.

त्यामुळे वुहानमधल्या चीनी प्रयोगशाळेत जैविक शस्त्रास्त्रे तयार करण्याचे प्रयत्न चालू असताना अपघाताने कोरोना विषाणू अपघाताने बाहेर पडल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली.

China Agitated because of Covid-19’s origin, unravels US ‘black history as US President Joe Biden ordered a probe into the Covid-19 origins

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात