मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत असा टोला मारत मराठा समाजाला आरक्षण भाजप सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरत आहेत त्यांनी काय केलं? शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केलं? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे.Sambhaji Raje is now looking to become a new leader, Narayan Rane’s slammed
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत असा टोला मारत मराठा समाजाला आरक्षण भाजप सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरत आहेत त्यांनी काय केलं?
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केलं? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे.पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले
, मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकार किती गंभीर आहे? स्वत: उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मताचे नाहीत.,’ असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंनाही कोपरखळी मारली.
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही, असं विधान काही दिवसांपूर्वी संभाजी राजे यांनी केलं होतं. यावर राणे म्हणाले की, ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं बोलणं चुकीचं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भाजपचे नेते राज्याचे नेते दौरे करत आहेत. सरकारने आता जो प्रस्ताव पाठवयाचा आहे तो अभ्यासपूर्ण असला पाहिजे.
त्यासाठी चांगले वकील आणि सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले मुद्दे आहेत,त्याला धरुन योग्य प्रस्ताव गेला पाहिजे. तसा प्रस्ताव भाजप तयार करत आहे आणि त्यासाठी भाजपने काही वकिलांची नेमणूक केली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून टोला मारताना राणे म्हणाले, ‘म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App