करोनावरील सध्याची लस डेल्टा प्लसलाही भारी पडणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’चा फुप्फुसांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता आहे, असा इशारा एनटीएजीआयचे अध्यक्ष डॉ. एन.के.अरोरा यांनी दिला. लशीचे एक किंवा दोन डोस घेतलेल्यांमध्ये सामान्यत: ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग सौम्य राहील असेही त्यांनी सांगितले. Vaccine will effective on Delta plus also



देशभरातील १२ राज्यांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. अरोरा म्हणाले, की कोरोनाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’चा फुप्फुसांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, त्यामुळे, अधिक गंभीर आजाराची शक्यता नसून तो अधिक इतर प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे, असाही याचा अर्थ होत नाही. डेल्टा प्लसचा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा फुप्फुसातील श्लेष्मल अस्तराला अधिक संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे नसलेले रुग्ण अधिक असल्याने ‘डेल्टा प्लस’ची रुग्णसंख्या अधिक असू शकते. अशा व्यक्तींकडून त्याचा अधिक प्रसार होत आहे. मात्र, ‘डेल्टा प्लस’चे पुरेसे लवकर निदान झाले आहे. अनेक राज्यांकडून त्याचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांत सूक्ष्मनियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे, या जिल्ह्यांत लसीकरणही वाढविले जाईल.

Vaccine will effective on Delta plus also

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात